महाराष्ट्र

शेरेचीवाडी गावातील विकासकामांसाठी साडे पाच लक्ष रुपयांचा निधी मंजूर

शेरेचीवाडी (ढवळ) ता. फलटण या गावातील विविध विकास कामांसाठी ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असून नुकताच शेरेचीवाडी गावातील अंतर्गत रस्त्यासाठी ३ लक्ष रुपये व प्राथमिक शाळा दुरुस्ती करिता २.५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासंबंधीची प्रशासकीय मान्यता झालेली असून ही दोन्ही कामे लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौ. दुर्गादेवी नलवडे यांनी दिली.

विविध विभागामार्फत प्राप्त होत असलेल्या निधीतून उत्तम दर्जाची कामे करण्यात येणार असून गावातील अनेक प्रलंबित प्रश्न येत्या काही दिवसांत मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सरपंच नलवडे यांनी सांगितले. जानेवारी २०२१ पासून शेरेचीवाडी गावासाठी आत्तापर्यंत जवळपास ४० लाखाहून अधिकचा निधी मिळविण्यात यश आले असून गावातील अंगणवाडीसाठी नवीन इमारत व अंतर्गत गटार योजनेचे काम सध्या चालू आहे. तसेच लवकरच जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम चालू होणार असल्याचीही माहिती तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हणमंतराव चव्हाण यांनी दिली.

विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, जि. प. मा. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जि.प. उपाध्यक्ष प्रदीप विधाते, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाश फडतरे, खटाव पं. स. उपसभापती संतोष साळुंखे, व पंचायत समिती सदस्य विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास मार्गी लागत असून अंतर्गत रस्ता व प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी जि. प. कडून साडे पाच लक्ष रुपयांचा विशेष निधी मिळवून दिल्याबद्दल ग्रामपंचायतीमार्फत सर्व मान्यवरांचे आभार मानन्यात आले. 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य राणी चव्हाण, अभिजीत मोहिते, शीतल फडतरे व महेश बिचुकले उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button