संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी
समाज उपयोगी उपक्रम राबवत विक्रमी 221 बाटल्यांचे रक्त संकलन
अहमदपूर – मराठा आरक्षण चळवळीचे संघर्ष योद्धे श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचा वाढदिवस येथील सकल मराठा समाज बांधवांनी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा केला यावेळी ठेवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये विक्रमी 221 जणांनी रक्तदान करत दादांचा वाढदिवस साजरा केला
सकाळी सर्वप्रथम तालुक्यातील आराध्य दैवत श्री रोकडोबा देवस्थान परचंडा येथे महा अभिषेक करण्यात आला व तालुक्यातील सर्व गावांमध्ये आपापल्या ग्रामदेवतास अभिषेक करण्यात आला त्यानंतर वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक समाज बांधवांच्या दारी व बांधावर फळझाडांची लागवड करण्यात आली त्यानंतर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये फळ वाटप करण्यात आले तसेच अनावश्यक खर्च टाळत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ही यावेळी करण्यात आले येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर दिवसभर अन्नछत्र चालू ठेवण्यात आले होते
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल 221 युवकांनी रक्तदान करत आपल्या लाडक्या दादांचा वाढदिवस साजरा केला
आरक्षण लडाच्या आंदोलनामध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या या तालुक्यामध्ये दादांचा वाढदिवस लोक उपयोगी उपक्रमांनी साजरा करत आपले वेगळेपण जपले आहे
तत्पूर्वी 29 जुलै रोजी दादांच्या समर्थनार्थ व शासनाच्या निषेधार्थ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते या दरम्यानच तालुका भरातील सबंध सकल मराठा समाज यांच्याशी चर्चा करत वाढदिवसानिमित्त वरील कार्यक्रम घेण्याचे बैठकीत ठरले होते
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाभरातील सकल मराठा समाज बांधव यांनी परिश्रम घेतले.