ताज्या बातम्या

सक्तीच्या रजेवर असलेले अधिकारी एस.जी.घुले यांना पुन्हा धरणगावी रुजू करण्याच्या हालचाली !

रेशनचा महाघोटाळा

धरणगाव – जिल्हाभरात रेशनचा घोटाळा गाजत असतांना धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेशन वाटपात घोळ असल्याचे दिसून आले होते. तालुक्यात मोठ्या प्रमाणात अफरातफर होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी प्राप्त होत होत्या. काही दिवसांपूर्वी चोपडा रस्त्यावरील ‘कमल जिनिंग’ येथे नाशिक च्या पथकाने धाड टाकून माल जप्त केला होता. या संपूर्ण घोटाळ्याचा उहापोह ‘लोकनायक न्यूज’ च्या वतीने ‘रेशनचा महाघोटाळा’ या मालिकेच्या रुपात सादर करण्यात आला होता. तालुक्यात होत असलेल्या संपूर्ण घटना व त्यात असलेला अधिकाऱ्यांचा सहभाग हे संपूर्ण लोकनायक न्यूज च्या माध्यमातून उजेडात आले होते. या मालिकेने संपूर्ण जिल्हाभरात खळबळ उडाली होती.

लोकनायक न्यूज च्या या मालिकेची दखल घेत धरणगावचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी धरणगाव तालुक्याचे पुरवठा अधिकारी ‘एस.जी.घुले’ यांच्यावर चौकशी सुरु करीत त्यांना दोन महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविले होते. घुले यांच्याकडे तालुका पुरवठा अधिकारी व गोदाम व्यवस्थापक या दोन पदांचा कार्यभार सोपविण्यात आलेला होता. या दोन पदांच्या कार्यभारामुळे पुरवठा विभागाचे संपूर्ण कामकाज ‘घुले’ हे सांभाळत होते.

तालुक्याची संपूर्ण पुरवठ्याची जबाबदारी घुले यांच्याकडे असल्याने त्यांनी मनमानी पद्धतीने आपले कामकाज सुरु केले होते. तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, नागरिक यांच्यासह जिल्ह्याचे अधिकारी देखील त्यांच्या कामावर फारसे खुश नव्हते. ‘लोकनायक न्यूज’ ने सुरु केलेल्या मालिकेमुळे एस.जी.घुले यांना दोन महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवीत त्यांची चौकशी सुरु करण्यात आली होती. आता हा दोन महिन्याचा कार्यकाळ संपण्याच्या मार्गावर आहे.

‘घुले’ यांचा चौकशी अहवाल सकारात्मक देण्यासाठी पडद्याआड मोठ्या हालचाली झाल्या आहेत. खालपासून – वरपर्यंत सर्व काही सोयीचे करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घुले हे पुन्हा धरणगावी नियुक्तीसाठी धडपडत आहेत. कोणताही विभाग द्या पण कामावर हजर करा असा पवित्रा त्यांनी घेतला असल्याचे कळते. आता चौकाशी अहवाल सकारात्मक येतो कि नकारात्मक ? कि तो दडपला जातो. अथवा कोणत्या विभागात घुले यांची नियुक्ती केली जाते ? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button