सर्व आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने आर्वी शहर बंद
अर्पित वाहाणे वर्धा प्रतिनिधी
आर्वी शहरातील आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने परभणी येथील भारतीय संविधान शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील भारतीय संविधानाची तोडफोड करणाऱ्या देशविरोधी कृत्य करणारी व्यक्तीवार वर देशदोहाचा गुन्हा दाखल करणे बाबत व शहीद सोपान सूर्यवंशी न्याय देण्यात यावा अशा मागणीचा निवेदन उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट यांना देण्यात आला. व संपूर्ण आर्वी शहर बंद ठेवण्यात आला.दिलेल्या निवेदनात दि. १०/१२/२०२४ रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालया समोरील भारतीय संविधान शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील भारतीय संविधानाची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीस फक्त अटक करून चालणार नाही तर त्याच्यावर प्रशासनाने देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करावी परभणी भीम सैनिकांचे गुन्हे मागे घेण्यात यावे, व शहीद सोपान सूर्यवंशी यांना तात्काळ न्याय मिळावा अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा निर्माण देखरेख समिती आर्वी व आंबेडकरी समाज बांधवांच्या च्या वतीने संपूर्ण आर्वी शहरात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. यास महाराष्ट्र सरकार संपूर्ण जबादार राहील याची नोंद घ्यावी असे लिखित निवेदन देण्यात आले. झालेल्या कृत्यामुळे आंबेडकरि समाज बांधवा तर्फे संपूर्ण आर्वी शहर बंद होते.दर्पण टोकसे, दीपक प्रवीण काळे, रवी गाडगे, सागर मोटघरे, अमरदिप मेहरे, आकाश वाघमारे, अजय बोंद्रे, संदेश डंभारे, गौतम मेश्राम , प्रमोद चौरपगार, अनिल माहूरे, प्रदीप मेंढे, गौतम कुंभारे, मधुकर सवाळे, पंजाबराव कांबळे, निरंजन पाटील, नरेश निवाते, सचिन पाटील, युवराज दहाट, सौरभ टोकसे, मंगेश सरोदे, सूरज डोंगरे, तुषार तळेकर, गजानन वावरे, संदीप पाटील, विनोद पायले, प्रवीण मनवर, विजय धुळे, गौतम पोहणे, रोहित बांबुडकर, सूरज मेहरे, प्रतीक नाखले, किरण कोल्हे, सुमित वाघमारे, अरविंद वाघमारे, विलास बेंडे, अनिकेत बांबूडकर, ईशांत हाडके, तेजस मोटघरे, साक्षात हाडके, अभय गायकवाड, रोहित रामटेके,मिलिंद मेहरे, कुंदन वासनिक , राहुल गोसावी, सूरज गजभिये, उज्वल पाटील, सर्व आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.