सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात २६ डिसेंबर हा वीर बाल दिवस म्हणून साजरा
धरणगाव – येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात भारत सरकारने निर्देशित केलेले तसेच महाराष्ट्र सरकारने काढलेल्या परिपत्रानुसार आज २६ डिसेंबर २०२२ हा दिवस वीर बालदिवस म्हणून साजरा करण्यात आला. .सांस्कृतिक समिती प्रमुख श्री कैलास माळी सर यांनी विद्यार्थ्यांना दहावे शिखगुरु श्री गोविंदसिंह यांचे बलिदान पुत्र श्री जोरावरसिंह आणि श्री फतेसिंह यांचे ९ वर्ष आणि ६ वर्ष वयाचे असतांना शीख संप्रदायाचा सन्मान ,अस्मिता हेतू रक्षणार्थ २५ डिसेंबर १७०५ रोजी या दोन वीर पुत्रांनी बलिदान दिले .त्यांच्या गौरवार्थ यांच्याबद्दल त्यांच्या जीवनाबद्दल माहिती सांगितली. या प्रसंगी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील सर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस एस पाटील सर, तसेच शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक समिती सदस्य किरण चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समिती सदस्य व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.