ताज्या बातम्या

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे

धरणगाव – तालुक्यातील सोनवद गावातील श्रीराम मंदिरात महाराष्ट्र राज्याचे लोकनेते, उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय आदरांजली अर्पण करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोनवद चे माजी सरपंच पुंडलिक पाटील (बाळू आबा) यांच्या पुढाकाराने राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्याप्रति संवेदना व्यक्त करण्याच्या उद्देशाने सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. सर्वप्रथम अजितदादा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुष्प वाहण्यात आले. अनेक मान्यवरांनी याप्रसंगी अजितदादा यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. पवार साहेबांचे पुतणे इथून सुरु झालेला प्रवास महाराष्ट्र राज्याचे लोकनेते इथे येऊन थांबला. राज्यातील वंचित – उपेक्षित – दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असेलेले दादा शेतकरी – कष्टकरी – बेरोजगार – अबालवृद्ध इ घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी अविरतपणे झटत राहिले. चंदनापरी ज्यांनी आपला देह झिजवला असे अजितदादा पुन्हा होणे नाही असा सुर वक्त्यांच्या बोलण्यातून जाणवला.
याप्रसंगी दामुआण्णा पाटील, बाळासाहेब पाटिल, गजानन पाटील, कल्पिता पाटील, चंद्रशेखर भाटिया, डॉ.गोपाल पाटील, सुभाष पाटील, हितेंद्र पाटील, राजेंद्र धनगर, नंदू धनगर, संजय पाटील सर, रंगराव सावंत, नारायण चौधरी, प्रेमराज पाटील, सुनिल पाटील सर, अनिल पाटील, गुलाबराव पाटील, धर्मराज पाटील, उज्वल पाटील, उदय पवार, विजय पाटील, लक्ष्मणराव पाटील, मोहीत पवार, दिनकर पाटील, खलील खान, जुनेद बागवान, प्रफुल पवार, साहिल खान, राजिद कुरेशी, सागर महाले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *