स्वातंत्र्य दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रावेर तर्फे काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रा मध्ये खा.रक्षाताई खडसे सहभागी
लोकनायक न्युज प्रतिनिधि – उमेश कोळी
रावेर – भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त रावेर शहर येथे “अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रावेर” तर्फे काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रा मध्ये स्थानिक नागरिकांसह खा. रक्षाताई खडसे यांनी सहभाग घेऊन, उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर “तिरंगा यात्रा” सरदार जी.जी. हायस्कूल येथून सुरवात होऊन अंबिका व्यायाम शाळा येथे समारोप करण्यात आला.यावेळी खा. रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष श्री.राजेंद्र लासुलकर, शहराध्यक्ष श्री.दिलीप पाटील, श्री.सी.एस.पाटील, श्री.चंद्रकांत भोलाणे, श्री.पंकज कोळी, श्री.उमेश महाजन, श्री.संदीप सावळे, श्री.लखन महाजन, अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री.भास्करदादा महाजन, श्री.रवी महाजन, अभाविप प्रदेश मंत्री श्री.नागेश गलांडे, अभाविप शहर मंत्री श्री.अनिकेत पाटील, शहर मंत्री श्री.युवराज माळी, शहराध्यक्ष श्री.अभिषेक महाजन, श्री.उदय दानी, श्री.अनिकेत बारी, श्री.भरत महाजन, श्री.लोकेश महाजन, श्री.अभिजीत लोणारी, श्री.राहुल पाटील ई. उपस्थित होते.