ताज्या बातम्या

अडावद आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक उनपदेव यात्रोत्सवासाठी सज्ज

प्रतिनिधी विनायक पाटील

दिनांक-३१ डिसेंबर २०२४ पासुन सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या श्री उनपदेव या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दिनांक-३१डिसेंबर२०२४ ते जानेवारी२०२५ पर्यंत यात्रोत्सवाची सुरुवात झाली असून, या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश, गुजरात व इतर राज्यातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सेवा किंवा शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठीची काळजी घेतली जावी या उद्देशाने.. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या आदेशानुसार…तालुका आरोग्य अधिकारी-डॉ. प्रदिप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली… प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद येथील वैद्यकीय अधिकारी-डॉ.पवन सुशिर, डॉ. अर्चना पाटील यांच्या सयुक्तिक रित्या आरोग्य कर्मचारी वर्ग व वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी यांचे पथक तैनात करण्यात आलेले आहे.त्या उद्देशाने प्रसंगी आज आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख, संतोष भांडवलकर, आर.एस. पाटील यांचे मार्फत विविध ठिकाणी जाऊन पिण्याच्या पाण्याची टाकीत OT टेस्ट घेण्यात आली, ot नसलेल्या ठिकाणी स्वतः त्यांनी TCL पावडर टाकुन शुद्धीकरण करून घेतले, व सदरच्या वेळी दररोजच्या पाणी शुद्धीकरण करणे कामी…वनरक्षक दशरथ पाटिल, संजय बेलदार, शांताराम कोळी व इतर कर्मचारी वर्ग यांना TCL पावडरचे मदर सोल्युशन कसे तयार करण्यात येते याबाबत प्रात्यक्षिक द्वारा.. आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख यांनी प्रशिक्षण दिले..आणि मदर सोल्युशन तयार करून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *