अमरावती-चिखली रा.मा.क्र.५३ वरील शेळद ते नांदुरा खंड चौपदरीकरणाचे केंद्रीय मंत्री श्री.नितीनजी गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण, यावेळी खा.रक्षाताई खडसे उपस्थित
जळगाव प्रतिनिधी – उमेश कोळी
जळगांव – अमरावती ते चिखली राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील शेळद ते नांदुरा या ४५ कि.मी. लांबी व रु.८१६ कोटी निधीच्या विकास कामाचे आज रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री.नितीनजी गडकरी यांच्याहस्ते डॉ.आंबेडकर खामगांव येथे लोकार्पण झाले, यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह खा. रक्षाताई खडसे उपस्थित होत्या.सदर शेळद-नांदुरा खंडाच्या चौपदरीकरण प्रकल्पाची एकूण लांबी ४५ किमी असून याअंतर्गत १४ किमीचा ग्रीनफील्ड बायपास, ४ प्रमुख पुल, १६ छोटे पुल, ६३ कल्व्हर्ट, १ आरओबी, ८ वाहन अंडरपास, २ पादचारी अंडरपास, १२ बस शेल्टर यांचा समावेश आहे. सदर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री.नितीनजी गडकरी मार्फत १२०० कोटी रुपयांच्या तरतुदीसह मलकापूर-बुलढाणा-चिखली व २५ कोटींसह चिखली ते टाकरखेड व अन्य रस्त्यांच्या कामांस मंजूरी देण्यात आली, याबाबत खा. रक्षाताई खडसे यांनी मार्च महिन्यात त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता.यावेळी केंद्रीय मंत्री श्री.नितीनजी गडकरी व खा. रक्षाताई खडसे त्यांच्यासह बुलडाणा खासदार श्री.प्रतापरावजी जाधव, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार श्री.चैनसुखजी संचेती, माजी मंत्री आ.श्री.प्रविणजी पोटे पाटील, डॉ.राजेंद्रजी फडके, भाजपा बुलडाणा जिल्हाध्यक्ष श्री.आकाशदादा फुंडकर, विधानपरिषद सदस्य आ.श्री.वसंतजी खंडेलवाल, आमदार श्री.राजेशजी एकडे ई. प्रमुख उपस्थितीत होते.