अहमदपूर जिल्हास्तरीय मासिक परिक्षेत्र भेट कार्यक्रमाचे अहमदपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये आयोजन
प्रतिनिधी बालाजी तोरणे पाटील, अहमदपूर
अहमदपूर : तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे विभागीय कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री आर टी जाधव, कृषि विद्यावेता श्री अरुण गुट्टे, उपविभागीय कृषि अधिकारी लातूर व उदगीर श्री जाधव, श्री काळे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका कृषि अधिकारी, यांच्यासह जिल्हास्तरीय मासिक प्रक्षेत्र भेट कार्यक्रम अहमदपूर तालुक्यात विविध गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर आयोजित केला गेला. प्रक्षेत्र भेटीची सुरुवात वटपोर्णिमेनिमीत्त सर्वाच्या हस्ते कृषि विभागाच्या विविध योजनेंतर्गत फळबाग व इतर वृक्ष लागवड करून करण्यात आली.सदरील प्रक्षेत्र भेटीदरम्यान तेलगाव येथे शेतकरी श्री व्यंकटराव पस्तापुरे यांच्या ड्रगनफुट या नाविन्यपूर्ण व्यापारी पिकाची पाहणी करण्यात आली. चोबळी येथे श्री बालाजी जवळगे यांच्या शेतात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत कृषि विभागाकडून दिलेल्या फळबागेस भेट दिली, शिरूर ताजबंद व थोरलीवाडी येथे श्री रवी पाटील, संगीता सोमारे यांच्या शेतातील BBF व टोकणपद्धतीने सोयाबीन लागवड प्रक्षेत्रास भेट दिली, काळेगाव येथे श्री आसिफ सय्यद यांच्या कपासी लागवडीची पाहणी केली. उगीलेवाडी येथे श्री सौरभ उगिले यांच्या केळी लागवडीस भेट दिली. शेवटी खानापूर येथे श्री राजकुमार शिंदे यांच्या शेतात कृषि विद्यावेता श्री अरुण गुट्टे यांनी सोयाबीन, सोयाबीन तूर कापूस लागवड, तसेच चालू खरीप हंगाम पिकातील पेरणी, पीकसंरक्षण, अन्नद्रव्य व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती दिली शेतकरी व कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच भाऊसाहेब फुंडकर, महाडीबीटी अंतर्गत सर्व घटक यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.सदरील प्रक्षेत्र भेटीच्या यशस्वीतेसाठी सर्व शेतकरी यांच्या सहकार्याने तालुका कृषि अधिकारी अहमदपूर अंतर्गत सर्व मंडळ कृषि अधिकारी, सर्व कृषि पर्यवेक्षक, सर्व कृषि सहाय्यक यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.शेवटी तालुका कृषि अधिकारी अहमदपूर श्री सचिन बावगे यांनी प्रक्षेत्र भेटीच्या यशस्वीतेबद्दल सर्वांचे आभार मानले.