ताज्या बातम्या

अहमदपूर : पीरूबाई उर्फ शांताबाई गायकवाड यांना अखेरचा निरोप

लोकनायक न्यूज प्रतिनिधी, बालाजी तोरणे पाटील अहमदपूर

मुखेड तालुक्यातील जांब बुद्रुक येथील रहिवासी असलेले 33 वर्षे आरोग्य सेवा करून सेवानिवृत्त झालेले कालकथीत मोकींद गोविंद गायकवाड यांच्या अर्धांगिनी पीरूबाई उर्फ शांताबाई हे मागील तीन महिन्यापासून शारीरिक क्षमतेच्या वयोमानानुसार आजारी पडल्या होत्या, म्हणून त्यांना नांदेड येथील ग्लोबल या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांच्या आजाराचे निदान लागले नाही व दिवसेंदिवस त्यांच्या तब्येतीची परिस्थिती खालावत जाऊ लागली आणि अखेर शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी पीरूबाई उर्फ शांताबाई यांची दुपारचे चार वाजेच्या दरम्यान राहत्या घरी 70 व्या वर्षी प्राणज्योत मावळली, त्यांचे पती बुद्धवासी मोकींद गायकवाड हे शासकीय आरोग्य सेवेत रुजू होताच त्यांनी नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी, बेळकोनी, हुनगुंदा या ठिकाणी वास्तव्यास राहुन अतिशय प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली, पीरूबाई उर्फ शांताबाई मोकींद गायकवाड या दांपत्याने अतिशय कष्टाने आपल्या सुखी संसाराचा गाडा ओढत सामाजिक व धार्मिक, कार्याचीही जाण राखली, अतिशय शांत स्वभावाचे, कोणालाही हेवा वाटावा असे हे जोडपे होते मात्र नियतीने मोकींद गायकवाड यांना आठ वर्षांपूर्वीच हिरावून घेतले व पीरूबाईंवर आजाराच्या रूपात घाला घालून 21 जून 2024 रोजी मातृ पितृ छायेपासून पोरके केले, अगोदर वडिल व आता आईच्या मायेचे छत्र हरपल्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अल्पावधीतच नावारूपाला आलेले आवाज बहुजनांचा न्यूज चॅॅनलचे संपादक शिवाजीराव गायकवाड यांच्या ते चुलती होत्या,त्यांच्या परिवारातील पुतणे, नातू, नाती, सुना, सेवानिवृत्त सैनिक, डॉक्टर, शिक्षक, शिक्षिका, आरोग्य कर्मचारी, व पत्रकार अशा विविध क्षेत्रात कार्यरत असून शेकडो नातेवाईक, लहान, थोर, पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 22 जून रोजी सकाळी 11:30 वाजता जांब बुद्रुक येथील बौद्ध स्मशानभूमी येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरण विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले,या अंतिम संस्काराचा विधी अहमदपूर येथील आप्तेष्ट बोधिसत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, ग्रामविस्तार अधिकारी राजेंद्र कांबळे यांच्या मंगल वाणीने संपन्न झाला, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा अहमदपूरचे अध्यक्ष प्रा. विश्वंभर स्वामी, प्रा. डॉ. बालाजी कारामुंगीकर, बालाजी तोरणे पाटील, माशुमभाई शेख आदी मान्यवरांसह उपस्थित बौद्धउपासक, उपासिका व समस्त जनसमुदायाने श्रद्धांजली वाहिली, त्यांच्या पश्चात असलेले दोन मुले श्रावण व दामोदर, सुना शोभा व योजना, मुली काशीबाई व शामलबाई, नातू अमोल, अजय, अक्षय, अविनाश, विशाल, कैलास, नाती सुनिता, प्रियंका, कल्पना मनीषा, वर्षा, ऐश्वर्या, अक्षरा व सर्व परिवाराला दुःखातून सावरण्याचा मार्ग मिळो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *