आदर्श ग्राम परचंडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा बोजवारा ; गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षक बेपत्ता
बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी
गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात
अहमदपूर : तालुक्यातील आदर्श गाव म्हणून गौरविण्यात आलेल्या परचंडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामीण भागात शिक्षणाचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत असुन जि.प.शाळेत शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात असल्याचे दिसत असून येथील प्राथमिक शिक्षक गेल्या सहा महिन्यापासून बेपत्ता असल्याकारणाने अहमदपूर शिक्षण पॅटर्नच्या नावाला गालबोल लागते की काय अशी अहमदपूर तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरु आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, आदर्श गाव परचंडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या एरिया डिजीटल सीसीटीव्ही फुटेज असतानाही गेल्या सहा महिन्यांपासून प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असलेला शिक्षक रविकांत गणेश चव्हाण हे ५ डिसेंबर २३ पासून कसल्याच प्रकारची पूर्वपरवानगी न घेता गैरहजर असल्याकारणाने अहमदपूच्या शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. परचंडा येथील सामाजिक कार्यकर्ते गोपाळ कानवटे यांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालय अहमदपूर येथे केलेल्या पाठपुराव्यामुळे येथील जिल्हा परिषदेचा शिक्षक सहा महिन्यापासून कर्तव्यावर नसून विनापरवानगी बेपत्ता असल्याचे समजले. शाळेच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतर १५ जुन ला शैक्षणिक सत्र सुरू झाले म्हणजेच शाळा सुरु झाल्यानंतर तरी गायब असलेला शिक्षक चव्हाण हे कर्तव्यावर येतील म्हणून वाट पाहिले व दहा बारा दिवसानंतर शाळेत चौकशी केली असता शाळेमध्ये गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी गटशिक्षणाधिकारी ढोकाडे यांना परचंडा येथील जिल्हा परिषेदेच्या शाळेतील शिक्षक रविकांत गणेश चव्हाण हे सहा महिन्यापासून कसलीच रजा न देता गैरहजर असून त्याच्या चौकशी संदर्भात काय कार्यवाही केली असल्याचे पत्राव्दारे विचारल्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांनी चव्हाण रविकांत गणेश प्रा.शिक्षक जि.प. प्रा.शा.परचंडा हे दिनांक ५ डिसेंबर २३ पासून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता शाळेवर अनाधिकृत गैरहजर असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.लातूर यांची कारणे दाखवा नोटीस क्र. ७२६ दि.२९ मे २४ अन्वये संबंधित शिक्षकावर गैर शिस्तीच्या / गैरव्यवहाराच्या वर्तणुकीबद्दल खाते चौकशी अनुसरण्यात येईल अशी कारणे दाखवा नोटीस दोषारोपसह देण्यात आलेली आहे. तसेच संबंधित प्राथमिक सहशिक्षक चव्हाण यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही चालू असल्याचे अहमदपूर पंचायत समिती कार्यालयातिल गटशिक्षणाधिकारी ढोकाडे यांनी पत्राव्दारे कळविले. आदर्शगाव असलेल्या परचंडा गावातील जिल्हा परिषेदेच्या शाळेतील शिक्षकांच्या गैरहजरीमुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसात होत असल्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी लातूर यांनी विशेष लक्ष घालून या जि.प.शाळेत कमी असलेल्या शिक्षकांच्या जागी कायमसरूपी शिक्षके द्यावीत अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.