ताज्या बातम्या
आबासाहेब शिवाजी पाटील यांना नासा ट्रस्ट तर्फे डॉक्टरेट पुरस्कार प्रदान

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
नूतन ग्रुप माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब शिवाजी सिताराम पाटील यांना ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नासा ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमानाने एस.एस.आर. या नवी दिल्ली येथील विद्यापीठाने दिल्लीचे कॅबिनेट मंत्री कपिल मिश्रा यांच्या उपस्थितीत मानद डॉक्टरेट पदवी आणि शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार केला.हा पुरस्कार ग्राम शाळा ते डिजिटल शाळा ह्या उपक्रमांतर्गत देण्यात आला त्याबद्दल त्यांचा सत्कार नुतन ग्रुप माध्यमिक विद्यालय चिचपुरा येथे करण्यात आला.प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.जी.पाटील व् ,आर.बी.पाटील जी. डी.पाटील . डी.के.पाटील एस.के.पाटील. व्ही.बी.सपकाळे .पी.एन.पाटील. घनशाम पाटील .अरुण पाटील. गोपाल पाटील ,उमेश पाटील, एकनाथ पाटील, इ.उपस्थित होते