आमदार बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधले विधानसभेत लक्ष…
बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी
अहमदपूर व चाकुर विधानसभा चे आमदार बाबासाहेब पाटील यांनी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरू असून या अधिवेशनात राज्यपालाचे अभिभाषनाला उत्तर देताना अहमदपूर चाकूर चे आमदार बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न मांडत राज्य सरकारचे लक्ष वेधले. सुरुवातीला आमदार बाबासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्य सरकारने वारकऱ्यांना नोंदणीकृत असलेल्या प्रत्येक दिंडीला २० हजार रु. अनुदान देऊन न्याय देण्याचं काम केलं, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत २१ ते ६० वर्षे वयोगटातील पात्र महिलांना प्रतीमहा १५००/- मंजूर केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय तसेच मुलींच्या उच्च शिक्षणासाठी निःशुल्क शिक्षण देण्याचा निर्णय घेतला, या निर्णयामुळे राज्यातील २ लाख विद्यार्थीनींना लाभ होणार आहे. असे ते म्हणाले. तसेच आमदार बाबासाहेब पाटील पुढे बोलताना म्हणाले की महाराष्ट्रात हरणे, डुकरे, माकडे अतिशय धुमाकूळ घालत आहेत. त्यासंदर्भात आपण नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करत आहात याबाबत दुमत नाही परंतु त्यापेक्षा ड्रिप साठी आपण अनुदान देतो तसेच प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट ठेऊन जाळे लावण्यासाठी अनुदान द्यावे. खरीप योजनेत २०२३ – २४ मध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापसाच्या पिकाला भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता यावेळी राज्य सरकारने हेक्टरी ५००० रु. देण्याचा निर्णय घेतला आहे. बळीराजाच्या शेती पंपांना १४ हजार ७६१ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी सरकारने ५०० कोटींचे अनुदान देऊन न्याय दिला आहे. किनगाव आणि अहमदपूर येथे १०० खाटांचे ग्रामीण रुग्णालय असे दोन प्रस्ताव असून या दोन्ही कामांना सरकारने मदत करावी अशी मागणी आमदार बाबासाहेब पाटील यांनी विधानसभा सभागृहात केली.