आर्वीत महामानवाला मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन
वर्धा प्रतिनिधि / अर्पित वाहाणे
स्थानिक आर्वी विश्वभूषण भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर मार्गक्रमण करणे हीच खरी आदरांजली : धम्म प्रचारक सुरेश भिवगडे यांचे प्रतिपादन.
विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 वी जयंती उत्सव समिती आर्वी तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयान दिनानिमित्त 6 डिसेंबर 2024 ला महामानवाला मानवंदना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर बुद्ध विहार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले याप्रसंगी विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 वी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुजित दादा भिवगडे व महासचिव सुरेश भिवगडे व कोषाध्यक्ष पंकज भिमके यांचे हस्ते अर्पण करून मानवंदना व ध्वजारोहण संपन्न झाले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्था आर्वीचे प्राचार्य तुषार लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते. ऑल इंडिया समता सैनिक दल शाखा आर्वी च्या वतीने मानवंदनेचा कार्यक्रम झाला. आदरांजली वाहून झाल्यानंतर उपस्थित पूजनीय भिक्खू संघाच्या हस्ते सामूहिक बुद्ध वंदनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
महामानवाच्या स्मृतीला अनुसरून हा कार्यक्रम संपन्न झाला
या कार्यक्रमाला दिलीप दादा पोटफोडे, पंकज भिमके, दिनेश सवाई, गौतम कुंभारे, प्रा. पंकज वाघमारे ओमप्रकाश पाटिल प्रा. डॉ विजया मुळे ई उपस्थित होते. बुद्ध विहार समन्वय समिती द्वारे आयोजित पालीभाषा परीक्षेची माहिती यावेळी देण्यात आली व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच संजय नगर येथील तक्षशिला बुद्ध विहार येथे सुद्धा मानवंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी येथे
जयंतीचे अध्यक्ष सुजित दादा भिवगडे,ग्रंथपाल सुरेश भिवगडे, सचिन मनवरे, सुरज मेहरे, पवन जंगम, शशिकला दहाट पूजा दहाट इत्यादी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका आर्वी तर्फे मानवंदना देण्यात आली.
आर्वी शहरातील विविध बुद्ध विहारात महामानवाला मानवंदना देण्यात आली
शारदा मून (फॉरेस्टर)
फॉरेस्ट ऑफिस आर्वी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाला अनुसरण छानशी रांगोळी बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर आर्वी येथे काढली 🙏🏻🙏🏻
यावेळी विश्व भूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 133 वी जयंती उत्सव समिती आर्वीचे अध्यक्ष सुजित दादा भिवगडे व महासचिव सुरेश भिवगडे प्रत्रकार मार्शल अर्पित वाहाणे आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन
विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 वी जयंती उत्सव समिती आर्वी
पंचशील युवक बहुउद्देशीय संस्था.
स्त्री उद्धारक सावित्रीबाई फुले महिला मंडळ,
संडे मिशन धम्म मिशन विविध सामाजिक संघटना ई. सहभागी होते.
आर्वी शहरातील उपासक उपासिका यांची मोठ्या प्रमाणात महामानवाला मानवंदना या कार्यक्रमाला उपस्थिती होती.