आ.एकनाथ खडसे लढले तरी खा.रक्षा खडसे दोन लाख मतांनी निवडून येतील : चंद्रशेखर बावनकुळे
प्रतिनिधि उमेश कोळी
रावेर लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे जरी निवडणूक लढले तरी विद्यमान खासदार असलेल्या रक्षा खडसे या दोन लाख मतांनी निवडून येतील असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे खा रक्षा खडसे गेल्या दोन टंपासून रावेर लोकसभेचे नेतृत्व करीत आहे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आमच्या सगळ्याच खासदारांनी उत्कृष्ट कामगिरी केली जाऊ नादी खा रक्षा खडसे यांनी लोकांमध्ये जाऊन चांगले कार्य केले खासदार म्हणून त्या पुन्हा निवडून येतील अशी पाठराखंड भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रक्षा खडसे यांच्या आगामी लोकसभेच्या विजयाबाबत केले आहे.इंडिया गाडीने जर रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडली तर पक्षाने आदेश दिल्यास लोकसभेची उमेदवारी करेल असे वक्तव्य नुकतेच आमदार एकनाथराव खडसे यांनी केले आहे मात्र याच रावेर लोकसभेच्या जागेवर गेल्या दोन टर्म पासून त्यांच्या सून असलेल्या रक्षा खडसे या खासदारआहेत. सून विरुद्ध सासरा अशी लढत राहण्याची तयारी सून असलेल्या रक्षा खडसे या खासदार आहेत. सून विरुद्ध सासरा अशी लढत राहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे काँग्रेसने जर रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादी करिता सोडली तर खडसे विरुद्ध खडसे अशी लढत रावेर लोकसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे. रावेर लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे आहे नऊ वेळा पराभूत झालेल्या काँग्रेसने राष्ट्रवादीसाठी जागा सोडावी अशी मागणी देखील आमदार एकनाथराव खडसे यांनी केली आहे.