ताज्या बातम्या

उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची १३ जानेवारी रोजी निवड

कोण होणार धरणगावचा उपनगराध्यक्ष, उत्सुकता शिगेला ▶

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे

नगरपरिषदेचा उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीसाठी पिठासन अधिकारी तथालोकनियुक्त नगराध्यक्ष लिलाबाई सुरेश चौधरी यांनी १३जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२वाजता सभा बोलावली आहे.
नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या ५१ अ -१अ च्या पोटकलम ९ नुसार नगरपरिषद व सदस्य निवडून आल्यानन्तर राजपत्रात नावे प्रसिद्ध झाल्याच्या २५ दिवसाच्या आत उपनगराध्यक्ष निवड आणि १ ब नुसार नामनिर्देशित सदस्य निवडीसाठी सभा बोलावणे आवश्यक असते. नगराध्यक्ष या सभेचा पिठासन अधिकारी असतो. उपनगराध्यक्ष निवड कार्यक्रम पुढील प्रमाणे
१३ रोजी सकाळी १०ते १२ नामनिर्देशन देणे व स्वीकारण्याची मुदत, नामनिर्देशन पत्रांची छाननी सभेत १५ मिनिट, अधिकृत
उपनगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दोन स्वीकृत नगरसेवक
तर दोन स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत त्यात महाराष्ट्र जनविकास आघाडी ला एक शहर विकास आघाडीचा एक स्वीकृत सदस्य नामनिर्देशित केले जाणार आहेत. यात देखील कोणाचे नंबर लागतात यावर धरणगावकरांच्या नजरा आहेत.

उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानन्तर माघार घेण्यासाठी १५ मिनिटे मुदत, त्यांनतर आवश्यक असल्यास निवड घेण्यात येईल , उपनगराध्यक्ष निवड झाल्यावर गट, आघाडी सदस्य संख्येनुसार नामनिर्देशित सदस्य निवड केले जातील. सुचवलेले सदस्य आवश्यक संख्येच्या जास्त असतील तर अनुक्रमे आधी ज्यांची नावे सूचित केली असतील त्यांना नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *