ताज्या बातम्या

एरंडोल-धरणगाव तालुका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीची सभा संपन्न

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव येथील इंदिरा कन्या माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात एरंडोल-धरणगाव तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी ची 34 वी सर्वं साधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. पतसंस्थेच्या चेअरमन श्रीमती रुपाली पाटील यांच्या अध्यक्षतेत सुरू झाली.पतपेढी चे संस्थापक अध्यक्ष मा अण्णासाहेब पी ए पाटील व एस आर पाटील. यांच्या उपस्थित प्रतिमा पूजन केले. इंदिरा कन्या शाळेचे सचिव मा सी के आबा पाटील, पी आर हायस्कूलचे मा मुख्याध्यापक मेजर डी एस पाटील, माजी मानद सचिव महाले सर यांच्यासह सर्वं ज्येष्ठ व श्रेष्ठ सभासद, उपाध्यक्ष आरती जैन, मानद सचिव सुनील पाटील व सर्वं संचालक सभेस हजर होते.
विशेष कार्य करणारे शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. दोन्ही तालुक्यातील नवनियुक्त मुख्याध्यापकांसह सर्वं गुणवंत पाल्याचा गुणगौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे संस्थेच्या निवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला.
अहवाल वाचन मानद सचिव सुनील पाटील यांनी केले. प्रास्ताविक पतपेढीच्या अध्यक्ष रुपाली पाटील मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन किरण चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन आरती जैन यांनी केले शाळेकडून सुरुची भोजनाची व्यवस्था केली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनात सर्वं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *