औसा तालुका खरेदी-विक्री संघाच्या सभापतीपदी संतोष सोमवंशी तर उपसभापतीपदी शेखर चव्हाण

लातूर औसा प्रतिनिधि / जीवन जाधव
औसा :-औसा तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाची निवडणूक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली होती. दि ९ एप्रिल सकाळी ११ वाजता खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आर.बी. सगर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
सभापतीपदी संतोष सोमवंशी यांची तर उपसभापतीपदी शेखर चव्हाण यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. शिवसेना जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती संघाचे सभापती संतोष सोमवंशी यांनी मागील कालावधीत औसा तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग, तूर , हरभरा, सोयाबीन खरेदी करून फार मोठ्या प्रमाणात दिलासा मिळवून दिला आहे. थोड्या कालावधीतच खरेदी-विक्री संघाने औसा तालुक्यात एक नावलौकिक कमावला आहे. तसेच उपसभापती म्हणून शिवसेना विधानसभा संघटक शेखर चव्हाण हे उजनी ग्रामपंचायत सदस्य असून बऱ्याच दिवसांपासून शिवसेनेचे काम करत आहेत.
निवडीप्रसंगी संघाचे संचालक क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कसबे राजीव केशव , जाधव गणेश प्रल्हाद , हिप्परसोगा माजी उपसरपंच मगर मारुती गोरखनाथ , हासाळ्याचे चेअरमन हांडे शिवाजी माधवराव, होळी चेअरमन साळुंके नंदकुमार नानासाहेब, डांगे केशव तात्याराव, धुमाळ बालाजी सुग्रीव,पाटील महादेव शामराव, साळुंके श्रीधर मनोहर, जाधव सविता अरविंद,साळुंके मायाबाई राजेंद्र, लवटे नवनाथ व्यंकट,माळी सत्यभामा गणपतराव, निवडणूक सहाय्यक चतुर्भुज धोंडगे, व्यवस्थापक श्रीकांत गोरे व शेतकरी उपस्थित होते.