जळगांव जिल्हा
कजगाव येथून वीस वर्षीय तरुणी बेपत्ता ; भडगाव पोलीस स्टेशन येथे मिसिंग दाखल
प्रतिनिधी – आमीन पिंजारी
जळगाव – भडगांव तालुक्यातील कजगाव येथून दिनांक 16 ,12 ,2023 रोजी सकाळी वीस वर्षीय तरुणी विद्या मल्हारी निकाळे ही भडगाव येथे मराठीचा पेपर आहे, असे सांगून निघून गेली आहे. मात्र ती घरी परतलीच नाही. सदर तरुणीचे वर्णन शरीराने सळ – पातळ, उंची पाच फूट चार इंच, लांब केस, अंगात पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, पिवळ्या रंगाचा रुमाल असे तरुणीचे वर्णन आहे. मिसिंग रिपोर्ट दिनांक 17 -12 -2023 रोजी मल्हारी उखा निकाळे वय 45 वर्ष यांनी प्रत्यक्ष भडगाव पोलीस स्टेशन येथे येऊन फिर्याद दिलेली आहे. तरी वरील वर्णनाची मुलगी कुठे आढळल्यास भडगाव पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन भडगाव पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे. हरवलेल्या तरुणीचा शोध भडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असल्याचे पोलीस फौजदार छबुलाल नागरे यांनी सांगितले आहे.