कलाशिक्षक परमेश्वर रोकडे यांचे चित्रमाध्यमातून समाज प्रबोधन
धरणगाव – गेल्या अनेक वर्षापासून कलाशिक्षक परमेश्वर रोकडे हे आपल्या आवडत्या कला विषयाच्या संगतीने संक्षिप्त रेषा व रंग माध्यमातून जनजागृती तथा समाज प्रबोधन करत आहेत. चित्र निर्मितीचे निमित्त मात्र राहिले ते *भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव* कलाशिक्षक रोकडे यांनी अमृत महोत्सवी निमित्त आपल्या शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे तब्बल 125 चित्रांचं चित्र प्रदर्शन व 40 रांगोळी प्रदर्शन भरवले. आणि ते नुकतेच संपन्न झाले. या चित्र प्रदर्शनाला खासकरून तालुक्यातील तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, पोलीस स्थानकचे पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक तथा तालुक्यातील अन्यखात्यातील अधिकारी वर्ग तसेच संस्थेचे पदाधिकारी, शाळेतील मुख्याध्यापक व गावातील प्रतिष्ठित नागरिक कलाप्रेमी , पालक वर्ग यांनी भेटी दिल्यात. या चित्र प्रदर्शनात विद्यार्थ्यांना चित्राची आवड निर्माण व्हावी व जीवनाला आनंद प्राप्त व्हावा. असेही म्हणता येईल.अतिशय सुरेख चित्र निर्मिती पाहून लोकांनी कौतुक केले. यातून एक मात्र दिसून आले की, ह्या चित्र प्रदर्शनाला मान्यवरांनी केवळ भेटच नाही तर सर्व बालचित्रकारांचे तोंड भरून कौतुकही केले. मला वाटतं विद्यार्थ्यांचे कौतुक हेच त्यांच्यासाठी मोठं बक्षीसअसतं आणि पुढच्या निर्मितीसाठी तो प्रेरणा मंत्र असतो. याच प्रदर्शनात शाळेतील कलाशिक्षक परमेश्वर रोकडे यांनी सुद्धा एक चित्र सादर करून वेगळ्या विषयाला हात घातला. तो म्हणजे कोरोना सारख्या महामारीला विश्वाने अतिशय खंबीरपणे जे तोंड दिलं आणि जिंकलेही . आपल्या भारत देशामध्ये जो कोरोनाने थैमान घातलेला होता यावर शासनाने योग्य ती वेळीच उपाययोजना करून कोरोना वरती मात केली आणि त्या कोरोनाला हरवून विजय प्राप्त केला. म्हणून चित्रामध्ये रोकडे यांनी चित्र रेखाटतांना जो विषय साकारला आहे त्यात स्पष्ट दिसत की,आजही कोरोनाला ठार मारून सर्व भारतीयांनी आपली ताकदीची वज्रमूठ बलशाली करून तिरंग्याची साथ आणि सोबत वॅक्सिंन याच्या जोरावर कोरोनाला हरवल्याचं दिसून येतंय.म्हणून आजही माझा भारताचा तिरंगा मोठ्या डौलाने फडकताना दिसतोय हा एक भक्कम पुरावा म्हणावा लागेल कलाशिक्षक परमेश्वर रोकडे यांनी याआधीही समाजाच्या जनजागृती म्हणून बेटी बचाव, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, लोकसंख्या, पाणी वाचवा ,स्वच्छता, भूकंपग्रस्तांसाठी मदत आधी अनेक विषयांवर चित्र रेखाटून प्रबोधनाचा काम केलेलं आहे. मित्रांनो, आपणास कल्पना आहे की चित्रकला ही अशी भाषा आहे की, जी सर्व जगातल्या शिक्षित अशिक्षित,ज्ञान अज्ञान वर्गाला सहज वाचता येईल नव्हे ती अर्थानेशी पूर्ण कळेल अशी सुंदर सुलभ भाषा आहे.अहो,जो एखादा अवघड विषय आपण समाजाला हजार शब्दात लिहून सांगू शकतो, तोच विषय केवळ एक रेषा व रंगांच्या माध्यमातून व्यक्त करता येतो. एवढी ही भाषा सोपी आहे. यानंतरही असे चित्र निर्मितीसाठी कलाशिक्षक रोकडे यांना शुभेच्छा देऊया!!!!