ताज्या बातम्या
काँग्रेससह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश !
धरणगाव शहरातील काँग्रेस सह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे साहेब शिवसेनेत प्रवेश पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निलेश भाऊ इंगळे,भगवान भाऊ महाजन,चंद्रकांत जाधव, राजेंद्र बोरसे,सुभाष चौधरी,मुकेश चौधरी,शांताराम चौधरी, घनश्याम सातव,शब्बीर सय्यद,अखिल कुरेशी, सचिन कासार यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सत्कार केला या प्रसंगी शिवसेनेचे प्रवक्ते माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील सर,नगरसेवक वासुदेव चौधरी,व्यायाम प्रसारक मंडळाचे संचालक भरत शेठ भाटिया,छोटू भाऊ जाधव,मुकुंद भाऊ नन्नवरे,सचिन दादा पवार,आबा महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.