कुणबी पाटील समाजातर्फे प्रबोधनपर कीर्तन संपन्न

“आई वडीलांची सेवा हाच खरा परमार्थ” – हभप स्वप्नील महाराज गिरडकर
धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव — येथील लहान माळी वाडा परिसरात भाद्रपद सप्ताहाच्या निमित्ताने समस्त कुणबी पाटील समाजाच्या वतीने आयोजित हभप स्वप्नील महाराज गिरडकर यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन उत्साहात संपन्न झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सालाबादप्रमाणे यावर्षी देखील कै रावा दगा पाटील, कै गयाबाई रावा पाटील, कै हभप प्रा प्रल्हाद बाबुराव पाटील यांच्या स्मरणार्थ रेश्माबाई भास्कर पाटील, सुशिलाबाई रामकृष्ण पाटील,वत्सलाबाई दामू पाटील व हिराबाई प्रल्हाद पाटील यांच्याकडून प्राप्त झालेल्या देणगीतून तसेच समस्त कुणबी पाटील समाज आयोजित भाद्रपद सप्ताहाच्या निमित्ताने कीर्तन आयोजित करण्यात आले होते. कीर्तनकर हभप स्वप्नील महाराज गिरडकर यांनी जगद्गुरू तुकोबांच्या अभंगाचा आधार घेऊन सद्यस्थीतीवर भाष्य करणारे प्रबोधन केले. संस्कारांची असलेली गरज, आई वडिलांची सेवा हाच खरा परमार्थ, प्रामाणिकपणा, कर्मकांड, अंधश्रद्धा इ मुद्द्यांवर गिरडकर महाराजांनी समाज प्रबोधन केले. कीर्तन झाल्यानंतर स्वप्नील महाराज गिरडकर यांचा शाल श्रीफळ देऊन तसेच ज्यांनी समाजाला देणगी दिली अशा चारही बहिणींचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच हभप सी एस पाटील, नाना महाराज, हिरालाल महाराज, सुकदेव महाराज, दिपक महाराज, दयाराम महाराज, भैय्या महाराज, सावता माळी भजनी मंडळ, जे ए पाटील सर, पत्रकार कडू रूपा महाजन, माळी – चौधरी – मराठे – न्हावी समाज लहान माळी वाड्याचे अध्यक्ष, राजेंद्र शंकर पाटील, हिलाल राजाराम मराठे, जयहिंद व्यायाम शाळा अध्यक्ष बजरंग साउंड सिस्टीम, मोहन आण्णा – बबलू पाटील – बाळू पाटील आदींचा श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लहान माळी वाडा परिसरातील समस्त कुणबी पाटील समाजाचे अध्यक्ष माधवराव पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, सचिव महेश्वर पाटील, सहसचिव दिनेश पाटील, खजिनदार लक्ष्मणराव पाटील, संचालक गणेश पाटील, चुडामण पाटील, कैलास पाटील, राजेंद्र पाटील, मोहन पाटील, किशोर पाटील, मंगेश पाटील, भिमराज पाटील, अशोक पाटील, आनंद पाटील, परशुराम पाटील, जितु पाटील, वाल्मिक पाटील शिपाई अशोक झुंजारराव तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज उत्सव समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मणराव पाटील यांनी तर आभार प्रदर्शन गणेश पाटील यांनी केले.


