कुर्डुवाडीच्या सौ.नसरीन शकील आतार यांचा राष्ट्रीय महिला उत्कृष्टता पुरस्कारांने दिल्ली येथे सन्मान
आतंरराष्ट्रीय महिला दिनाच्या प्रसंगी नॅशनल युथ अवारडीज फेडरेशन ऑफ इंडिया, डॉ.विशाखा वेलफियर सोशिल फाऊडेशन व तसेच “सशक्त नारी,सशक्त भारत” अभियाना अंतर्गत राष्ट्रीय महिला संसद २०२३ उत्कृष्ट महिला कुर्डूवाडीच्या रेल्वे हॉस्पिटल मध्ये चिफ नर्सिंग अधिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सौ. नसरीन शकील आतार यांना नॅशनल वूमन्स एक्सेलेन्स अवॉर्ड १२ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्र सदन प्रेस हॉल येथे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
राष्ट्रीय महिला संसद २०२३ यामध्ये बालिकावर तसेच महिलावर होणारे विनयभंग, अत्याचार याविरुद्ध राष्ट्रीय चर्चासत्रासह सहभागी होऊन सौ नसरीन शकील आतार यांनी आरोग्य सेवा रेल्वे हॉस्पिटल प्रशासनाच्या सहाय्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच देशातील मान्यवर महिला यांनाही नॅशनल वूमन्स एक्सेलेन्स अवॉर्ड २०२३ प्रदान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवनीत राणा संसद सदस्य , रिंचेन ल्हामो सदस्य राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, सौ.सुरेखा लांबतुरे माजी सदस्य राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग,श्री.बबनराव घोलप माजी मंत्री, श्री. माणिकराव ठाकरे माजी गृहमंत्री महाराष्ट्र तसेच नॅशनल युथ फेडरेशन ऑफ इंडिया व डॉ.विशाखा वेलफियर सोशिल फाऊडेशनचे अध्यक्ष डॉ.मनीष गवई दिल्ली आदी मान्यवर व्यक्ती हजर होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचे श्री. शहाजहान आतार व श्री जावेद आतार यांनी अभिनंदन केले.