कु करमाने कळसच गाठला ; विनयभंग आणि बलात्काराने परिसर दणाणला
लोकनायक न्यूजसाठी, गुणवंत कांबळे, गंगाखेड, परभणी
परभणी : गंगाखेड पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हामध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. हाणामारी, गुंडगिरी,चोरी या पाठोपाठ आता महिंलांची छेडछाड, विनयभंग, बलात्कार यासारख्या घटनेत वाढ झाली आहे. गंगाखेड शहरातील बस स्थानक समोरील आनंद लॉज या ठिकाणी अल्पवयीन मुलीचा दिवसाढवळ्या बलात्कार केला जातो, लॉजिंग वर सर्रास शाळाकरी मुलीला घेऊन जातात . लॉजवर शाळकरी मुली जात आहेत याची माहिती पोलिसांना दोन महिने अगोदरच होती पण कारवाई का झाली नाही ही घटना कदाचित टळली असती परंतु पोलीसांनी या माहितीला गांभीर्याने घेतले नाही. शेवटी या लॉजमध्ये शाळकरी मुलीवर बलात्कार झालाच या घटनेनंतर शहरात वेगवेगळ्या घटनेला सुरुवात झाली आहे. विनयभंग आणि बलात्काराच्या घटना थांबण्याचे नावच घेत नाही एकाच दिवशी तीन विनयभंग व एक बलात्कार असे गुन्हे गंगाखेड पोलीस ठाणे अंतर्गत घडले आहेत.
दि. ६ सप्टेंबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात २४ वर्षीय युवतीचा व १३ वर्षीय एक आणि १७ वर्षीय एका वेडसर अल्पवयीन मुलींचा विनयभंग तर १९ वर्षीय युवतीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये नरसिंग सुदाम गायकवाड या अंदाजे ४० वर्षापेक्षा अधिक वयाच्या शिक्षकाने गंगाखेड येथे भाडेकरू म्हणून राहत असताना जानेवारी २०२४ ते ७ ऑगस्ट दरम्यान सकाळ, सायंकाळ रनिंगला जात असलेल्या २४ वर्षीय युवतीचा पाठलाग करत तिच्या व्हॉटसपवर व्हिडिओ कॉल करून संदेश पाठवित युवतीच्या वडिलांच्या ही मोबाईलवर संदेश पाठवून लग्नाची मागणी करत विनयभंग केल्याची तक्रार दिल्याने नरसिंग सुदाम गायकवाड रा. अहमदपूर ह.मू. जिंतूर याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गुन्ह्यात पुर्णा तालुक्यातील वझुर येथील १९ वर्षीय युवती दि. २ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास शौचास गेली असता गावातीलच मुंजा बनसोडे वय ३० वर्ष व अन्य एका अनोळखी इसमाने सदर युवतीला दुचाकीवर बसवून उसाच्या शेतात पळवून नेले व मुंजा बनसोडे याने तिच्यावर अत्याचार केल्याची फिर्याद दिल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.गंगाखेड तालुक्यातील ढवळकेवाडी येथील कृष्णा उत्तम जाधव वय ३४ वर्ष याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वेडसर पणाचा फायदा घेत तिला बाथरूममध्ये तिचा विनयभंग केल्याची फिर्याद तिच्या आईने दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथ्या गुन्ह्यात तालुक्यातील सुरळवाडी येथील इयत्ता ७ वी च्या वर्गात शिक्षण घेणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ४ वाजे दरम्यान शाळेत घटक चाचणीचा पेपर सोडवीत असतांना बालाजी भंडारे रा. बोर्डा ता. गंगाखेड या शिक्षकाने तिचा विनयभंग केल्याची फिर्याद दिल्याने दि. ७ सप्टेंबर रोजीच्या पहाटे विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोनराव बोडखे, सपोनि राम गित्ते, सपोनि शिवाजी सिंगणवाड, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड हे करीत आहेत. गंगाखेड पोलीस ठाण्यात एकाच दिवशी दाखल झालेल्या या चार गुन्ह्यातील आरोपींमध्ये दोन शिक्षकांचा ही समावेश असल्याने एकच खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलींचा विनयभंग करून अत्याचार करणाऱ्या आरोपींची पोलीसांनी धिंड काढावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीने कळस गाठला विनयभंग आणि बलात्काराच्या घटनेने परीसर दणाणुन गेला आहे.या घटनेला आळा बसला पाहिजे अशी मागणी सुज्ञ नागरिकातुन केली जाते आहे.