क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्था संचलित अनुदानित आश्रम शाळेत मौखिक आरोग्य जागरूकता व तपासणी शिबिर संपन्न

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी जाणून घेतली तंबाखू, गुटखा, सिगरेट मुळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती व आयुष्यभर हे व्यसन न करण्याची घेतली प्रतिज्ञा
दि 19 जुलै शनिवार रोजी क्रांतिकारी खाज्याजी नाईक संस्था संचलित अनुदानित आश्रम शाळा येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील तसेच धरणगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार धरणगाव येथील दंतरोग तज्ञ डॉ. श्री मयूर जैन व दंतसहाय्यक श्री. प्रविण पाटील यांचे कडून मौखिक आरोग्य जागरूकता व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना दाताची निगा कशी राखावी, मौखिक आरोग्य जपण्यासाठी खान – पान कसे असावे, तसेच तंबाखू, गुटखा, सिगरेट या व्यसनांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देत सर्वांकडून हे व्यसन करणार नाही अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.
याप्रसंगी डॉ मयूर जैन यांनी ज्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना दातांविषयी समस्या होत्या अशा 30-35 विद्यार्थ्यांना तपासणी नंतर उपचारासाठी औषधी देण्यात आली.
डॉक्टरांनी दर तीन महिन्याला असे शिबिर घेऊन सर्व विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्याबद्दल माहिती व तपासणी करण्यात येईल असे आश्वासन दिले व सर्व विद्यार्थ्यांना टूथ पेस्ट व ब्रश भेट देऊन दातांची निगा कशी राखावी याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस बी गायकवाड सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री सी एस वाघ सर यांनी केले संस्थेकडून श्री अमोल जाधव सर यांनी डॉ मयूर जैन यांचा सत्कार केला याप्रसंगी, प्रतिक जैन, मनोज रायपूरकर, सचिन भावसार,शाळेचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिक्षक आ. दगडू आबा सूर्यवंशी सर, सौ सुवर्णा महाजन मॅडम सर्व शिक्षक,व चेतन माळी,शशिकांत चौधरी, सौरभ वाघरे सर्व स्टाफ उपस्थित होते, क्रांतिकारी खाज्याजी नाईक संस्थेचे अध्यक्ष- भाईदासजी सोनवणे, सचिव- श्री विलासजी महाजन सर,सहसचिव- श्री समाधान भाऊ मोरे, कोषाध्यक्ष श्री वाय पी पाटील सर, किशोर चौधरी सर व सर्व संचालक यांनी डॉ मयूर जैन व टीम चे आभार व्यक्त केले, तसेच या उपक्रमाचे व टीम चे सर्व संचालक व सभासद यांनी अभिनंदन केले.