क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले उड्डाणपुलावरील एका बाजूचे स्ट्रीट लाईट दोन महिन्यांपासुन बंद ; विद्युत अभियंत्यांचे अजब गजब उत्तर

धरणगांव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगांव शहरातून जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रेल्वे उड्डाणपुलावरील स्ट्रीट लाईट गेल्या दोन महिन्यांपासुन बंद आहेत. विशेष म्हणजे ऐन धरणगांव नगरपालिकेच्या निवडणूक कालावधीत देखील हे लाईट बंदच होते. निवडणुकीनंतर आता नगरपालिकेवर नव नियुक्त नगराध्यक्ष तथा नगरसेवक विराजमान झाले असून, अधिकाऱ्यांच्या काळातील हे बंद असलेले लाईट आता तरी सुरु होतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत याकडे कोणत्याही राजकीय पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे लक्ष गेले नाही का ? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. नगरपालिका निवडणूक संपली आता जिल्हा परिषद निवडणूक येत आहे. ग्रामीण भागातील अनेक छोटे – बडे नेते, कार्यकर्त्यांचा वावर या रस्त्याने होत असतो. तरी जिल्हा परिषद निवडणुकीत इच्छुकांनी आपल्या नेत्यांकडे स्ट्रीट लाईट दुरुस्तीची मागणी करावी. अशी आशा व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात धरणगांव नगरपालिका विद्युत विभागाचे अभियंता राहुल तळेले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अजब गजब उत्तर दिले. त्यांनी म्हटल्यानुसार एका बाजूचे लाईट बंद आहेत पण दुसऱ्या बाजूचे तर सुरु आहेत. असे अजब गजब उत्तर दिले. पुन्हा विचारले असता स्ट्रीट लाईट ची उंची कमी असल्याने त्याकामी योग्य व्हेईकल उपलब्ध झाल्यावर उंच असलेली सर्वच स्ट्रीट लाईट दुरुस्त करण्यात येतील असे सांगितले.


