खांबावर चढुन विद्युत लाईन दुरुस्ती करणे जिवावर बेतले ; पेंढरी शिवारात करंट लागुन एका तरुणाचा मृत्यू
लोकनायक न्युज करिता, किशोर गणविर सावनेर, नागपुर
सावनेर तालुक्यातील खापा पोलीस स्टेशन अंतर्गत पेंढरी शिवारात लाईन दुरुस्ती करित असतांना करंट लागुन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार (8 आक्टोंबर) ला दुपारी बारा वाजता च्या सुमारास ऊघकिस आली.
मृतक अमित पुनाराम दरडेमल (वय ३० वर्ष) असे मृत तरूणाचे नाव असुन हेटिखेडा ता.सावनेर जि.नागपुर येथील रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमित ला लाईन दुरूस्ती व घरगुती विद्युत फिटिंग असे वायरमनचे काम येत असल्याने गावातील घरगुती छोटेमोठे लाईन दुरूस्ती, इलेक्ट्रीकल वायरमन चे काम करित असायचा. पेंढरी शिवारात मंगळवार ला शेतातील विद्युत लाईन बंद असल्याने दुरूस्ती करिता गेला होता.पेंढरी शिवारातील काही शेतकऱ्यांच्या शेतातील मोटर बंद असल्यामुळे रविन्द्र काकडे यांनी त्याला लाईन दुरुस्ती करीता बोलावले होते.शेतकऱ्याच्या शेतातील मोटार पंप चे मिटर बघितल्यानंतर तो समोर जावुन एका खंब्यावर चढला आणि लाईन दुरुस्ती करित होता.खांबावर चढुन लाईन दुरुस्ती करित असतांना अचानक विद्युत सुरू असलेल्या जिवंत तारेस स्पर्श झाल्याने जोराचा करंट लागुन खाली पडला.काही वेळ तो खालीच पडुन राहिला. तेथील लोकांच्या लक्षात येताच त्याला लगेच खापा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला सावनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले.पण तेथे दाखल करताच त्याचा मृत्यू झाला.पुढील तपास खापा ठाणेदार विशाल गिरी करीत आहे.अमितच्या अकस्मात मृत्यू ने कोथुळणा, पेंढरी परिसरात शोककळा पसरली आहे.