गंगाखेड विधानसभेत बारा उमेदवार रिंगणात तर तेरा जणांची माघार
प्रतिनिधि – गुणवंत कांबळे
गंगाखेड : उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटच्या दिवसी तेरा उमेदवार यांनी माघार घेतल्याने बारा उमेदवार निवडणूक रिंगणात आसून त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने चिन्हाचे वाटप करण्यात आले आहे.
दि.4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी मागे घेण्यात आलेल्यात एमआयएमचा शिरीन बेगम मो.शफीक, मदनजी रेनगडे पाटील ,कदम संजय साहेबराव, कदम स्मिता संजय, जोंगदंड मुंजाजी नागोराव ,प्रवीण गोंविदराव शिंदे ,बालासाहेब हरिभाऊ निरस ,भगवान ज्ञानोबा सानप ,लक्ष्मण शंकरराव शिंदे, विशाल बबनराव कदम, शे. हबीब शेख रसुल, श्रीकांत दिंगबरराव भोसले यांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात शिवसेना उबाठाचे कदम विशाल विजयकुमार,देशमुख रुपेश मनोहरराव मनसे, माधव सोपानराव शिंदे राष्ट्रीय मराठा पार्टी, रत्नाकर माणिकराव गुट्टे राष्ट्रीय समाज पक्ष, विठ्ठल जिवनाजी रबदडे जनहित लोकशाही पार्टी, सितारम घनदाट (मामा) वंचित बहुजन आघाडी तर अपक्ष अलका विठ्ठल साखरे नामदेव रामचंद्र गायकवाड,भोसले विष्णुदास शिवाजी,विठ्ठल सोपान निरस,विशाल बालाजीराव कदम,अॕड.संजीव देवराव प्रधान निवडणूक रिंगणात आसून त्यांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले आहे. शिवसेना उबाठाचे कदम विशाल यांना मशाल मनसेचे देशमुख रुपेश रेल्वे इंजीन,रत्नाकर गुट्टे अॕटोरिक्शा विठ्ठल रबदडे किटली सिताराम घनदाट गॕस सिंलेडर ,अपक्ष अलका साखरे खाट, विष्णुदास भोसले हिरा, विठ्ठल निरस टेबाल, विशाल बालाजीराव कदम चिमणी,अॕड संजीव प्रधान,नामादेव गायकवाड माधव शिंदे या तिन उमेदवारांचे चिन्ह निवडणूक आयोगाचा मार्गदर्शना नंतर दिले जाणार आसल्याचे निवडणूक अधिकारी जिवराज डापकर यांनी स्पष्ट केले.