गाडगे बाबांनी केवळ समाज स्वच्छ केला नाही तर लोकांची मनेही स्वच्छ केली : डॉ लीलाधर बोरसे
धरणगांव प्रतिनिधि / विनोद रोकडे
धरणगाव : येथे संत गाडगेबाबा ची ६८वी पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी डॉ बोरसे यांनी संत गाडगेबाबा याचा जीवनप्रवास मांडला,व्यक्तिपरिचय होणे कठीण आहे, मात्र गाडगे बाबा म्हणताच व्यक्ती, कार्य आणि त्यांचे समस्त जीवन आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ म्हणत अध्यात्माच्या मार्गातून त्यांनी समाजप्रबोधनही केले. असे डॉ बोरसे यांनी मत व्यक्त केले यावेळी डॉ डी पी पाटील यांनीगाडगे बाबा हे एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भेट देत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधारक आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. असे मत व्यक्त केले यावेळी शिवसेनेचे सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ , मा लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते पप्पु भावे उपजिल्हा प्रमुख ऍड शरद माळी परीट समाजाचे जेष्ठ प्रकाश जाधव , चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे ,परीट समाज जिल्हा उपाध्यक्ष छोटू जाधव , युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रवी जाधव, शहर अध्यक्ष गणेश जाधव , युवा मोर्चा शहर अध्यक्ष विनोद रोकडे शिवसेना शहर प्रमुख विलास महाजन शिवसेना उ बा ठा शहर प्रमुख भागवत चौधरी मा नगरसेवक जितेंद्र धनगर उद्योजक वाल्मिक पाटील , धिरेंद्र पुरभे , रवी महाजन पवन महाजन, शाम पाटील विनोद जाधव, राजू बोरसेनागराज पाटील भिकन पाटील संजय शुक्ला महाराज, भैय्या जाधव , आकाश जाधव, मयूर जाधव लकी जाधव राजू महाले,राहुल जाधव, किरण महाजन , पवन महाजन रोहित चौधरी,सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.