ताज्या बातम्या
घनदाट मामा यांची वंचित कडुन उमेदवार फिक्स
गंगाखेड गुणवंत कांबळे
गंगाखेड विधानसभेचे माजी आमदार सिताराम चिमाजी घनदाट यांनी वंचित बहुजन आघाडीचे तिकीट घेतल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे. उद्या सिताराम घनदाट गंगाखेड या ठिकाणी येऊन अधिकृत वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळाली. घनदाट हे तिनं वेळेस गंगाखेड विधानसभेचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. गंगाखेड विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव गट विशाल कदम राष्ट्रीय समाज पक्षाकडुन रत्नाकर गुट्टे, वंचित बहुजन आघाडी सिताराम घनदाट भाजपाकडून कोण येणार याची उत्सुकता सध्याला कायम आहे गंगाखेड विधानसभा चौरंगी लढत होण्याची शक्यता होण्याची शक्यता आहे.