घुंगराळा येथील खंडोबा यात्रेत जंगी कुस्तीचा फड रंगला
प्रतिनीधी – शंकर अडकिने
नांदेड : नायगांव तालुक्यातील घुंगराळा येथे पूर्वपार परंपरेने खंडोबा देवस्थानची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते या यात्रेत कुस्त्यांची दंगल हा मोठा कार्यक्रम असतो, यंदा आज कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत कै. माधवराव आत्माराम पा. सुगावे यांच्या समरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे 21,000 रुपयाचे खंडोबा केसरी हे प्रथम बक्षीस अच्युत टरके (किवळा) व श्रीकांत (जालना) या दोन पहिलवानामध्ये विभागून देण्यात आली, तर व्दितीय क्रमांकाचे 11,000 रुपये बक्षीस विलास डोईफोडे (कोल्हापूर) यांना व तृतीय क्रमांक 7111 रुपये परमेश्वर बामणिकर (कंधार) यांना देण्यात आले. या कुस्ती स्पर्धेत नांदेड जिल्यासह जालना,यवतमाळ,कोल्हापूर,हिंगोली दिल्ली, हरियाणा, सांगली, सातारा,बीड,जालना,पुणे, येथील अनेक कुस्ती चे पहेलवाण आले. कुस्ती पाहणीसाठी जवळपास 8 ते 10 हजार कुस्तीप्रेमी रात्री 9. पर्यंत उपस्थित होते.
जिल्यांसह पर राज्यांतील हरियाणा येथीलही पहिलवान कुस्ती खेळण्यासाठी आले होते या कुस्ती स्पर्धेत 100 ते 125 कुस्त्या लावण्यात आल्या, या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी श्री कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते व महावितरण चे अधीक्षक अभियंता श्री जाधव साहेब श्री नांदेड जिल्हा परिषद नांदेड चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री मुक्कावर साहेब नायगाव पंचायत समिती चे गटविकास अधिकारी श्री वाजे साहेब,नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक अजय कदम, महावितरण चे कार्यकारी अभियंता श्री चटलावार साहेब,उप उप अभियंता श्री तिवारी साहेब, कुंटुर चे पोलीस स्टेशन चे बाहत्तरे साहेब, नायगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मुखेडकर साहेबआदी मान्यवरांच्या प्रमुख उस्थितीमध्ये झाले. सदर कुस्त्यांचे सामने दुपारी2.00ते रात्री 9.00 वाजेपर्यंत या वेळात संपन्न झाल्या.कुस्तीचे पंच म्हणून केरबा पा. सुगावे, संभाजीराव तुरटवाड,किसनराव दंडेवाड, प्रल्हाद पा. ढगे,मुरहरी तुरटवाड,माधवराव ढगे,बळवंत बानेवाड, साईनाथ सुगावे, विलास यमलवाड, सूरज सुगावे, विकास बोंडले,संजय सूर्यवंशी,संतोष कंचलवाड, व्यंकटी बानेवाड,शंकर यमलवाड,बाबाराव पा. सुगावे, शिवाजी तुरटवाड,विनायक तुरटवाड यांनी काम पाहिले. अखेरची मानाची खंडोबा केसरी कुस्ती कुंटुर पोलीस स्टेशनचे सहाययक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली.
कुस्ती स्पर्धेसाठी नागोराव दंडेवाड,शिवाजी पा. ढगे,बालाजीराव मातावाड, श्यामसुंदर पा. ढगे,बालाजीराव हाळदेवाड,श्यामराव यमलवाड,चंद्रप्रकाश पा. ढगे,रतन गंदमवाड,अरुण सूर्यवंशी, राम पा. सुगावे,शंकरराव यलपलवाड,मारोतराव कंचलवाड,श्रीराम पा. सुगावे, गंगंगाधरराव बोधनकर, सुनील यलपलवाड, संतुक पा. ढगे, रोहिदास पा. ढगे,गंगाराम सूर्यवंशी, शेषराव पा. ढगे,व्यंकटराव कंचलवाड,ग्रामसेवक शिंदे,महेश पा. ढगे ,सुग्रीव गजभारे यांच्यासह गावकरी व युवकांनी परिश्रम घेतले.