ताज्या बातम्या

चक्क रस्त्यांच्या अभ्यासासाठी महाराष्ट्रातील अभियंते ऑस्ट्रेलियात ; मात्र ऑस्ट्रेलियाचे चकचकीत रस्ते बनविणारा अभियंता महाराष्ट्रीयन !!

जयराम कोळी, मुक्त पत्रकार

मूळ महाराष्ट्रीय वाहन व पादचारी यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेले जमिनीवरील मार्ग म्हणजे रस्ते.

हे वेगवेगळ्या जनसमुहातील दळणवळणाचे प्राथमिक व प्रधान साधन आहे. चांगले रस्ते व दळणवळणाची साधने प्रशासकीय दृष्टीने महत्वाचे घटक बनलेले आहेत. भारताने आपली आर्थिक सुबत्ता भलेही पाचव्या क्रमांकावर आणली असली तरी, रस्त्यांच्या बाबतीत पाश्चिमात्य राष्ट्रांच्या तुलनेने आपण खूपच मागे आहोत. रस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी यांनी सन 2000 मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली. त्यामुळे देशात लाखो किलोमीटर रस्त्यांचे नवीन जाळे विणले व नवीन वेगवेगळ्या प्राधिकरणांमधून हुशार व कामसू अभियंत्यांची निवड करून, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय सुरू केली. अन्य प्राधिकरणांपेक्षा प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत झालेली रस्त्यांची कामे सरस व उजवी दिसून येत होती. परंतु या योजनेला देखील स्थानिक राज्य सरकारे व पुढार्‍यांची नजर लागली. कार्यकारी अभियंते उपअभियंते सर्व आपल्या मर्जीप्रमाणे नेमण्याची स्थानिक लोकप्रतिनिधींना सवय लागली.

पे अँड कमिशन मुळे रस्त्यांच्या पुलांच्या कामासंदर्भात दर्जा घसरला. प्रधानमंत्री सडक योजना ही राज्यात मुख्यमंत्री सडक योजना म्हणून रूपांतरित झाली.

आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने राज्यातील ग्रामविकास विभागातील तब्बल एकोणावीस अधिकारी ग्रामीण भागातील रस्त्यांचे काम पाहण्यासाठी ऑस्ट्रेलिया व न्युझीलँड येथे दौऱ्यावर गेलेले आहेत. यामध्ये मंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कार्यालय जळगाव येथील कार्यकारी अभियंता श्री राठोड साहेब हे देखील दौऱ्यात गेलेले आहेत. हे तेच राठोड साहेब आहेत की जे आठवड्यातून एकदा कार्यालयात येतात साइटवर जाने यांना माहित नाही. कामांचे, संकल्प कामांचे संकल्पचित्र येण्याच्या अगोदर बिल देण्याच्या पायंडा देखील यांनी पाडलेला आहे. यांच्या अगोदर श्री विवेक माळुंदे, श्री विजय पाटील हे देखील कार्यकारी अभियंते जळगाव मध्ये होते. ते नाशिक येथे राहूनच जळगावचा गाळा हाकीत होते. श्री विजय पाटील यांच्या तीन-चार वर्षाच्या कार्यकाळात ते केवळ दहा ते बारा वेळा जळगाव मध्ये आलेले होते. तरी देखील याच विजय पाटील यांची अधीक्षक अभियंता म्हणून बढती झाली याचीही शासनाने चौकशी करणे जरुरीचे आहे. रस्त्यांमध्ये वापरले जाणारे मटेरियल त्यांची टिकाऊ पणाची क्षमता यामध्ये दिवसेंदिवस वापरण्यात येणारी अद्ययावत टेक्नॉलॉजी या सर्व गोष्टींचा अभ्यास येथे राहून देखील करता येतो. परंतु नुसता टूर म्हणून 19 अधिकारी दौऱ्यावर गेले आहेत काय ? अशी शंका निर्माण होते.

ऑस्ट्रेलियातील बहुतांश चकचकीत रस्ते डॉक्टर विजय जोशी यांच्या अधिकाराखाली निर्माण झालेले आहेत. डॉक्टर विजय जोशी यांना ऑस्ट्रेलियाचा अभिमानाचा बहुमानाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. व डॉक्टर विजय जोशी मूळ महाराष्ट्रीयन असून ठाण्याचे रहिवासी आहेत. डॉक्टर विजय जोशी यांच्या म्हणण्यानुसार डांबरी रस्त्यांची टिकाऊ क्षमता ही 12 ते 15 वर्षापर्यंत असते व सिमेंट रस्त्याची टिकाऊ क्षमता जवळपास 28 वर्षांपर्यंत असते. असे चित्र आपणाकडे दिसत नाही. परंतू ग्रामविकास विभागातील वरिष्ठ 19 अधिकाऱ्यांना ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड दौऱ्यावर पाठविण्यापेक्षा डॉक्टर विजय जोशी यांनाच महाराष्ट्र सरकारने ठाणे येथे बोलवून त्यांच्या यथोचित सत्कार करून शेकडो अभियंतांसाठी प्रशिक्षण आयोजित करणे जरुरीचे होते. परंतु 23 वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू करणाऱ्या पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी सारखा दूरदृष्टीकोण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिसून येत नाही. हे खेदाने नमूद करावेसे वाटते . जळगाव सहित महाराष्ट्रातील अन्य विभागांमध्ये रस्त्यांची कामे ऑस्ट्रेलिया व न्युझीलँड प्रमाणे होतील अशी आशा करूया.

(जयराम कोळी, मुक्त पत्रकार मोबाईल नंबर 9960124904)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *