चहार्डी गावाला अनाथ गाव घोषित करण्यात यावे ; आम आदमी पार्टीची अनोखी मागणी
प्रतिनिधी – चोपडा तालुका/ विनायक पाटील
जळगाव जिल्हा आम आदमी पार्टी तर्फे चहार्डी गावा संदर्भात निवेदन देण्यात आले.
चोपडा – तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेले हे चहार्डी गाव आहे. या गावामध्ये ग्रामसेवक सतत गैरहजर असल्यामुळे तिथल्या नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. जसे की उतारे, दाखले, गावातील समस्या, साफसफाई, उघड्यावरील मैला नदीत वाहून जातो. त्यामुळे नळाचा पाण्याचा रिपोर्ट दूषित आलेला असून तरी देखील ग्रामसेवक, सरपंच इतर कोणीही कारवाई करीत नाही. यामुळे गावकरी पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत.
ग्रामपंचायत मधील कामगारांचा पगार स्थगित असल्यामुळे कामगार कामावर येत नाहीत व दिव्यांग बंधू भगिनी यांना निधी मिळाला नसून दिव्यांग वंचित आहेत.व विविध प्रकाराच्या गावातील समस्या इत्यादी बाबी करिता गावासाठी पूर्ण वेळ ग्रामसेवक यांची नियुक्ती करावी या संदर्भामध्ये आम आदमी पार्टीचे साखळी उपोषण ९ ऑगस्ट पासून आजच्या दिवसापर्यंत सुरू आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुद्धा नागरी सुविधां करिता ग्रामस्थांना आंदोलन सुरू ठेवावे लागले तसेच चोपड्याचे बी. डी.ओ.नी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही .यामुळे गावकऱ्यांना तीव्र आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे व आपण मुख्य सी.ई.ओ वेळेत वेळ काढून चहार्डी गावाला न्याय दयावा अन्यथा चोपडा तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले चहार्डी गावाला अनाथ गाव म्हणून घोषित करावे अशी मागणी जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन द्वारे करण्यात येत आहे .
या निवेदन देण्या प्रसंगी उपस्थित जळगाव जिल्हा अध्यक्ष मिलिंद चौधरी. माजी जळगाव शहर महानगर कार्य अध्यक्ष योगेश हिवरकर ,मीडिया प्रमुख योगेश भोई ,डॉ अनुजा पाटील ,सरिता तायडे ,डॉ नारायण आटकोरे ,पवन खंबायत ,ओम प्रकाश अग्रवाल ,मुकुंदा बराटे ,भीमराव मोरे , विठ्ठलराव साळुंखे , समाधान बाविस्कर, सुधीर पाटील , आर डी पाटील आदी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.