चहार्डी ग्रा.पं.स पूर्ण वेळ ग्रामसेवक मिळणे साठीचे साखळी उपोषण लेखी आश्वासनानंतर अखेर मागे : दिव्यांगांसाठी प्रहार सरसावली…
प्रतिनिधी- चोपडा तालुका/ विनायक पाटील
चोपडा प्रतिनिधी - चहार्डीग्रामपंचायतीस पूर्ण वेळ ग्रामसेवकाची नेमणूक व दिव्यांगांना त्यांचा हक्काचा निधी मिळावा यासाठी आम आदमी पक्ष शाखा चहार्डीचे कार्यकर्ते व दिव्यांग बंधू तब्बल 20 दिवसांपासून गावातील महादेव मंदिरात साखळी उपोषणास बसले होते.
20 दिवसांत सी ई ओ यांना दोन वेळा निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाची दखल घेत येत्या दोन दिवसात नवीन ग्रामसेवक रूजू करण्याचे लेखी आश्वासन त्यांनी दिले आहे. सदर साखळी उपोषणास प्रहार दिव्यांग क्रांती संस्था ( महाराष्ट्र राज्य ) ने आपला जाहीर पाठिंबा देत जो पर्यंत दिव्यांगांना त्यांचा हक्काचा निधी मिळणार नाही तो पर्यंत पाठपुरावा करू असे आश्वासन प्रहारचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
चोपडा तालुक्यातील नंबर २ ची लोकसंख्या असलेली चहार्डी ग्रा.पं. कार्यालयाचे कामकाज पुर्णवेळ होत नाही, ग्रामसेवक सतत गैरहजर असतात, ग्रामसेवकाचा मनमानी कारभार सुरु असून नागरिकांना कोणत्याही नागरी सुविधा मिळत नाही. ग्रा.पं. कार्यालय दुपारी १२ वाजेनंतर बंद राहते. नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जसे की, उतारे, दाखले वेळेवर मिळत नाहीत. गावातं स्वच्छता, साफसफाई होत नाही, गटारी व सार्वजनीक शौचालयांची सफाई होत नसून मैला उघडयावर वाहून नदीत जातो त्यामुळे पाणी दुषीत होवून नागरिकांच्या आरोग्य व गावातील पशुधन यांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गावातील कुपनलिकेच्या पाण्याचा रिपोर्टपण दुषीत आला असुन ग्रा.पं. कडे त्यांचा रिपोर्ट जमा आहे परंतु कोणतीही कार्यवाही नाही.
तसेच ग्रा.पं. कार्यालयातील कामगारांचे पगार थकीत आहेत. त्यामुळे कामगार कामावर येण्यास विलंब होतो, पाणी पुरवठा वेळेवर होत नाही, तसेच गावात दुषीत पाण्याचा पुरवठा होत असुन साथीचे आजार उदभवू शकतात.
तसेच दिव्यांग बंधु-भगिनींना दिव्यांग निधी मिळाला नसून त्यापासुन ते वंचित आहेत. या सर्व सुविधांसाठी चहार्डी ग्रा.पं. तीस पुर्णवेळ व निवासी ग्रामसेवकाची नेमणूक व्हावी जेणेकरुन नागरिकांची कामे वेळेवर होतील. यासाठी आम आदमी पक्षाचे तालुका उपसंयोजक मुकुंदराव पाटील व गावातील दिव्यांग बंधू ९ ऑगस्ट क्रांती दिवस पासून साखळी उपोषणास बसले होते. आज २० व्या दिवशी लेखी आश्वासन नंतर साखळी उपोषण सोडण्यात आले.
यावेळी प्रहारचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील , सुरेश पाटील ( रावेर ) , रविंद्र पाटील ( खडगाव ) , भगवान वैदू ( तालुका अध्यक्ष – प्रहार ) आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद चौधरी, योगेश हिवरकर, योगेश भोई, विठ्ठलराव साळुंखे ( जिल्हा उपसंयोजक ) , आर डी पाटील ( शिक्षक आघाडी – जिल्हाध्यक्ष ) , समाधान बाविस्कर ( तालुका संयोजक ) , सुधीर पाटील ( शहर संयोजक ) सिताराम वसंत पाटील , दिपक भाईदास पाटील , प्रकाश रघुनाथ सोनवणे, गोविंद लालचंद कोळी , अनिल मधुकर महाजन , भगवान रतन वाणी ( ज्येष्ठ नागरीक ) यांसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.