ताज्या बातम्या
चोपडा तालुक्यातील गणपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत सैनिकांचा सत्कार
गणपूर (ता चोपडा) ता 12: येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमात ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. सुरवातीला खास तयार करण्यात आलेल्या शिला फलकाचे पूजन सैनिकांच्या हस्ते करण्यात आले.विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सैनिक व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतीचे प्रशासक जे पी पाटील यांनी प्रास्ताविक केले.ऍड बाळकृष्ण पाटील,ईश्वर पाटील,राम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी मातीचे दिवे प्रज्वलित करून उपस्थितांना शपथ दिली गेली.विवेक पाटील यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाला विविध संस्थांचे पदाधिकारी,सैनिक ,शिक्षणप्रेमी,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.