ताज्या बातम्या

चोपडा महाविद्यालयात गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार

लोकनायक न्युज प्रतिनिधि लतीश जैन

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयात गुणवंत प्राध्यापकांच्या ‘सत्कार समारंभाचे’ आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर निवड झालेल्या वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.एम.बागुल, इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.के.डी.गायकवाड यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावयांच्यातर्फे उत्कृष्ट संशोधन (पेटंट) बद्दल तसेच मराठी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ.एम.एल. भुसारे यांना उत्कृष्ट संशोधन (पब्लिकेशन्स) या संदर्भातील पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल या सर्व गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील यांनी ‘प्राध्यापकांच्या यशस्वी कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडत आहे. हा सन्मान संस्थेच्या व महाविद्यालयाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.यापुढे महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवून संशोधन क्षेत्रात नावलौकिक मिळवावा व त्याचा समाजासाठी व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी फायदा करून द्यावा’ असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए. वाघ, रजिस्ट्रार डी.एम.पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *