ताज्या बातम्या

चोपडा येथील माणक ज्वेलर्स येथून ७ तोळे सोने २०० ग्रॅम चोरीची चांदी जप्त शिरपूर पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा

एका महिन्यात दुसऱ्यांदा माणक ज्वेलर्स कडून सोन हस्तगत…

चोपडा : येथील माणक ज्वेलर्स यांच्याकडून दि ३० मे रोजी घरफोडी करणाऱ्या चोराकडून चोरीचे सोन विकत घेतल्याप्रकरणी २७ तोळे सोन शहादा पोलिसांनी जप्त केले होते.ह्या घटनेला महिना होत नाही तोच शिरपूर तालुक्यात दि.२४ जून रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास शहरात पेट्रोलिंग करीत असताना शिरपुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक हेमंत खैरनार यांना काही संशयास्पद व्यक्ती शिरपूर शहरातील निमझिरी नाक्याजवळ हेरगिरी करतांना आढळून आले. त्यांना हटकले असता एक संशयित पळून गेला तर दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे.त्यांच्याकडुन एक मोटारसायकल व दरोडा घालण्याचे साहित्यासह ८५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.तर तिसरा पळून गेला आहे.राजेंद्रसिंग उर्फ राजन प्रितमसिंग बरनाला वय २६, ईश्वरसिंग नुरबिनसिंग चावला वय २३ दोन्ही रा.उमर्टी ता.वरला जि. बडवानी (मध्यप्रदेश) पळून गेलेला आरोपी शेरसिंग निर्मलसिंग जूनेजा रा.उमर्टी अशी या आरोपींची नावे आहेत.सदरील आरोपी हे घरफोडी चोरी करणारे सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.यातील दोन्ही आरोपींनी चोरीचे सोने चोपडा शहरातील माणक ज्वेलर्स चे संचालक नवीन प्रवीण टाटीया यांना विकल्याचे शिरपूर पोलिसांकडे कबूल केले आहे.यासंदर्भात शिरपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने या आरोपीताना दि.२९ रोजी चोपडा शहरातील मेनरोड वरील माणक ज्वेलर्स येथे आणून शहानिशा करीत संचालक नवीन टाटीया यांचे जाब जबाब घेत चौकशी केली.साधारणतः 7तोळे सोने व 200 ग्रॅम चांदी जप्त केले असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. रात्री उशिरपर्यंत चौकशी सुरू होती.या संबंधितअधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोलिस उपनिरिक्षक हेमंत खैरनार यांना फोन केले असता प्रतिसाद दिला नाही मग त्यांना मेसेज केले असता सोने चांदी जप्त केले असल्याचे सांगितले दि.३० रोजी सकाळी शिरपूर पोलिस ठाण्यात संचालक नवीन टाटीया यास चौकशी कामी बोलवण्यात आल्याचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरिक्षक हेमंत खैरनार यांनी पत्रकारांना सांगितले.महिन्याभरापूर्वी देखील शहादा येथील सोने चोरी प्रकरणात याच माणक ज्वेलर्स कडून २७ तोळे सोने रिकव्हरी करण्यात आले होते.मात्र रिकव्हरी दिल्यानंतर पोलिस यंत्रणेकडून त्यांना ‘क्लीन चिट’ का? देण्यात येते.सोने चोरणाऱ्यावर गुन्हा दाखल होतो मात्र चोरीचे सोने घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन त्यास अटक का होत नाही अशी चर्चा शहरात होत आहे. चोपड्यात आलेल्या गुन्हे शोध पथकात पोलिस उपनिरीक्षक हेमंत खैरनार,पोहेकॉ ललित पाटील,पोकॉ विनोद अखडमल,गोविंद कोळी,भटू साळुंखे,आरीफ तडवी यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *