चोपडा येथे पहिली हॉर्स रेस स्पर्धा उत्साहात संपन्न ; सागरभाऊ ओतारी व सभापती नरेंद्र पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
चोपडा प्रतिनिधी विनायक पाटील
चोपडा येथील सैय्यद ब्रदर्स यांच्या तर्फे चोपडा शहरात प्रथमच हॉर्स रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार प्रा. चंद्रकांतअण्णा सोनवणे यांचे खंदे समर्थक शिवसेनेचे सागरभाऊ ओतारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
चोपडा येथील इम्रान अल्ताफ खाटीक, तेजस उर्फ पप्पु राजेंद्र पाटील, मुदस्सर अली मुख्तार अली सैय्यद, विकी संतोष बडगुजर, अकोलोद्दिन शगिरोद्दीन, हैदरअली शराफत अली, मुबशिर अली मुजम्मिल अली, सैय्यद जैद जफर अली यांच्या वतीने हॉर्स रेस स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा आडगाव रोड, गूळ फॅक्टरी जवळ, चोपडा येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सागरभाऊ ओतारी व नरेंद्र पाटील यांचे ढोल ताशांच्या गजरात शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना आयोजकांनी घोड्यावर स्वार करून फीत कापण्यास नेले. या स्पर्धेत सुरत येथून 3 घोडे, मांडळ येथून 2 घोडे, चाळीसगाव येथून 1 घोडा, शिरपूर येथून 1 घोडा तर चोपडा तालुक्यातून 24 घोड्यानी अशा एकूण 31 घोड्यानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. चोपडे शहरात घोड्यांची पहिलीच स्पर्धा असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या स्पर्धेस नागरिकांचा खूप उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक घोडा मालकाचे स्वागत आयोजकांनी केले होते. या स्पर्धेस मिळालेल्या उस्फुर्त प्रसादाने आयोजक चांगलेच भारावले आणि या पुढे यापेक्षाही मोठी स्पर्धा आयोजित करण्यात येईल असेही आयोजकांनी बोलून दाखवले.या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सुरत येथील गब्बर भाई यांच्या घोड्याने रू 11 हजार, द्वितीय पारितोषिक चाळीसगांव येथील जितू भाई यांच्या घोड्याने रू 6 हजार रुपये चे बक्षीस पटकावले.