चोपडा शहरातील अंगणवाड्या मध्ये पुरविला जाणारा पोषण आहाराचा दर्जा नित्कृष्ट
संतप्त पालकांनी केली जिल्हाअधिकारी यांच्याकडे केली तक्रार ; निकृष्ट पोषण आहारमुळे मुलांना विष बाधा झाली अथवा आजारी पडले त्याला आम्ही जबाबदार राहू पर्यवेक्षक प्रमिला पावरा यांचे बेजाबदार उत्तर
प्रतिनिधी-विनायक पाटील
चोपडा शहरात 22 अंगणवाड्या आजच्या परिस्थितीत सुरु आहेत. वं चोपडा शहरातील सर्व अंगणवाडी मध्ये बालकांना पुरविला जाणारा पोषण आहाराचा ठेका ठेकेदारास देण्यात आलेला आहे. असे आम्हाला अंगणवाडी कर्मचारी सांगतात तो पोषण आहार एका रिक्षा मध्ये ठेवून सर्व अंगणवाडी मध्ये वाटप केला जातो. शासनाने आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणता पोषण आहार द्यावा याबाबत नमूद केलेलं आहे. परंतु त्या नियमानुसार कधीही पोषण आहार दिला जात नाही. अंगणवाडी मध्ये वाटाणे, खिचडी, किंवा बिस्कीट हा आहार दिला जातो . वाटाणे खिचडी यामध्ये अनेकवेळा किडे व अळ्या दिसतात त्याचप्रमाणे खिचडी मध्ये दाळ व तांदूळ व्यतिरिक्त काहीही नसते. सदरचा आहार अतिशय निकृष्ट प्रतीचा असतो. त्याबाबत आम्ही आज पर्यंत अनेकवेळा अंगणवाडी सेविकांच्या निदर्शनास सदरची बाब आणून दिलेली आहे . परंतु ते कोणतीही कार्यवाही करत नाही. याउलट ते सांगतात कि, हे काम आमचे नसून ठेकेदाराचे आहे . ठेकेदाराने बनवून आणलेला आहार आम्ही फक्त वाटप करत असतो.दि – 27-09-2023 रोजी पोषण आहारात वाटाणे दिलेले होते. त्यामध्ये अळ्या व किडे दिसत होते. म्हणून आम्ही पालकांनी ते डब्बें पर्यवेक्षक प्रमिला पावरा यांना प्रत्यक्ष दाखविले त्यावेळी त्या भाट गल्ली परिसरात मराठे समाज मडी मध्ये कार्यक्रमात उपस्थित होत्या. त्यावेळी भाट गल्ली परिसरातील काही पालकांनी देखील मुलांचे डबे त्यांना दाखविले परंतु त्यांनी आम्हाला कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. अश्या निकृष्ट पोषण आहारमुळे मुलांना विष बाधा झाली अथवा आजारी पडले तर त्याबाबत काय कार्यवाही करणार अशी विचारणा केली असता . त्याला आम्ही जबाबदार राहू असे बेजबाबदार पणाचे उत्तर त्यांनी दिले. म्हणजे शासन व कर्मचारी हे मुलांच्या आरोग्याचा व भवितव्याचा विचाराबाबत उधासीन धोरण अवलंबत आहे. व अनुचित प्रकार घड़ल्यानंतर त्याची दखल घेतली जाईल असा त्यांचा बोलण्याचा सूड होता म्हणून याबाबत आपल्या स्थरावरून तात्काळ योग्य ती दखल घेण्यात यावी. व संबंधिता विरुद्ध तात्काळ योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. हि विनंती आहे.आम्ही सदर पोषण आहाराचे मोबाईल मध्ये फोटो काढून ठेवलेले आहेत . तरी आपल्या स्थरावरून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी .या आशयाचे निवेदन बारी वाडा व कुंभार वाडा भागातील पालकांनी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे .