चोपडा शहर पोलिसांनी २ गावठी कट्टया सह तीन युवकांना केली अटक
प्रतिनिधी विनायक पाटील
चोपडा : शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गावठी कट्टा बाळगणाऱ्या तीन युवकांना चोपडा पोलिसांनी केली अटक करण्यात आली आहे. दि.११/०८/२०२४ रोजी ०८.२० वा. चे सुमारास चोपडा-चुंचाळे रोडवर स्वामी समर्थ केन्द्राच्यापुढे चोपडा शिवारत मध्यप्रदेशातील ईश्वर किसन डावर वय-१९ वर्ष रा. आसरापानी तहसील वरला जि. बडवानी २) पवन आकाराम खरते वय-१७ वर्ष रा. कुंडिया तहसील वरला जि. बडवानी ३) पप्पु जयमाल डावर वय-१८ वर्ष रा. कुंडिया तहसील वरला जि. बडवानी तीन संशयित युवक एम.पी.-४६-एम.व्ही.०२९१ एच एफ डिलक्स काळ्या रंगाची लाल पट्टे असलेली संशयित रित्या बाईक वर जात असतां चोपडा शहर पोलिसांनी तिन्ही संशयितांची अंगझडती घेतली असता आरोपी ईश्वर किसन डावर वय-१९ वर्ष रा. आसरापानी तहसील बरला जि. बडवानी याच्या पाठीवरील बॅग मध्ये त्याचा ताब्यात विनापरवाना २ गावठी कट्टे (अग्नीशस्त्र), २ जिवंत काडतुस, १ चाकु, तसेच २ चोरीचा संशय असलेल्या मोटार सायकल त्याच्या ताब्यातील एकूण १,६९,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) (३) उल्लघंन सह १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि मधुकर सावळे यांच्या आदेशाने सपोनि. एकनाथ भिसे हे करीत आहेत.