ताज्या बातम्या

चोपड्यात मिळून आला ओला गांजा, आरोपी मात्र फरार

प्रतिनिधी-विनायक पाटील

जळगांव : चोपडा तालुक्यातील ऊत्तम नगर येथे गेल्या आठवड्यात देखील गांजा तस्काराच्या विरोधात ग्रामीण पोलीसांनी सर्वांत मोठी कारवाई केली होती परत आज पुन्हा बुधगांव फाटा येथे अज्ञात आरोपीचा विरोधात वीस किलो गांजा मिळाल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे व सदर आरोपी फरार असुन पोलिस कसुन तपास करत आहेत. डीवायएसपी सुनील नंदवाळकर सो.अमळनेर,चार्ज चोपडा यांच्या पथकाने व चोपडा ग्रामीण पथकाने मिळून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आलेली आहे.गुन्हा दाखल करण्याचे काम राञी उशिरा पर्यंत सुरु होते.चोपडा ते शिरपुर रोडवर हातेड गाव पास करुन पुढे डाव्या हातास असलेले बुधगांव फाट्याजवळ येवुन सदर बातमी प्रमाणे मोटार सायकल स्वार याची वाट पाहत असतांना चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशनचे सरकारी वाहन आले त्या वाहनामध्ये सायंकाळी 05.00 वाजेचे सुमारास पो. नि. सो कावेरी कमलाकर ,तहसिल अधिकारी, रविंद्र भगवान माळी मंडळ अधिकारी हार्तेड, दोन शासकिय पंच गुलाब प्रभाकर वाडे सफाई कामगार, चोपडा नगरपरिषद, रविंद्र शेनपडु वाघ, सफाई कामगार, चोपडा नगर परीषद, फोटो ग्राफर राहुल अनिल धोबी, वजन काटासह वजन काटा धारक गोकुळ नारायण शिरसाठ असे आले व दोन मोटार सायकलवर सफौ राजु श्रावण महाजन, पोशि विनोद पवार, पोशि सुनिल कोळी,पोकॉ रावसाहेब पाटील असे आले, त्यानंतर मिळालेल्या बातमी प्रमाणे वाट पाहत थांबले त्यावेळी सायंकाळी 17.30 वा चे सुमारास शिरपुर कडुन बुधगांव फाट्याजवळ एक इसम त्याचे मोटार सायकलवर येतांना व त्याचे मोटार सायकलचे पेट्रोल टाकीवर एक खाकी रंगाचे पोते ठेवलेले दिसले तो पोलीसांच्या दिशेन येत असतांना त्यास पोलीस उभे असल्याचा संशय आल्याने तो त्याच्या ताब्यातील मोटार सायकल व पोत्यासह सोडुन तेथुन पळुन जावु लागला तसेच पोहवा राकेश पाटील, पोकॉ विनोद पवार,पोकॉ रावसाहेब पाटील. अशांनी त्याचा पाठलाग केला परंतु तो तेथे असलेले काटेरी झाडे झुडपातुन शेताच्या रस्त्याने पळुन गेला त्यानंतर पंच व तहसिल अधिकारी यांचे समक्ष सदर मोटार सायकल पाहीली असता ती काळे रंगाची शाईन कंपनीची होती. व त्याचे जवळ मोटार सायकलवर असले पोत्यात काय आहे याची खात्री केली असता त्यामध्ये हिरवट रंगाचा थोडा ओलसर गांजा वनस्पतीचा पाला व त्यास फुल बिया असलेला मिळुन आला वीस कीलो गांजा ,मोटार सायकल सह किंमत १७०९२४/- रुपये मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतले.व सदर फरार आरोपीचा तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *