जळगांव – ऋषिकेश जाधव सरांचा ‘मौलाना आझाद आदर्श’ पुरस्काराने गौरव
दिव्यांग शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ऋषिकेश जाधव सरांना भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्काराने गौरविण्यात आले.
जळगाव : जिल्हाधिकारी अल्पबचत भवन सभागृहात मोठ्या थाटात भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्काराचे वितरण सोहळा पार पडला.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार राजूमामा भोळे , महापौर जयश्रीताई महाजन , कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वामी समर्थ शैक्षणिक संस्थेचे व गं. सं. सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील होते तर इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार, नोबल इंग्लिश स्कूल पाळधीचे चेअरमन अर्चना सूर्यवंशी,ॲड. सलीम देशपांडे ,जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी विजय परदेशी ,शिक्षण विस्ताराधिकारी खालील शेख, सामाजिक कार्यकर्ते निवेदिता ताठे मॅडम ,भारतीताई मस्के, हर्षाली पाटील, छाया केळकर ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. पाकीजा पटेल तसेच मौलाना आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले असता धरणगाव मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव सर यांना दिव्यांग शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार साहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ज्योती राणी मॅडम यांनी केले तर आभार ईश्वर महाजन यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थापक फिरोज शेख पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.