जळगांव – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या “इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट” वेबसाईटवर बंदी आणा : महात्मा फुले समता परिषदची मागणी
धरणगाव येथे पोलिस निरीक्षक यांना दिले निवेदन
धरणगाव – “इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट” नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेलं आहे शरयु इन्ट नावाची संस्था इंडिक टेल्स ही वेबसाईट चालवते . सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय ‘ अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखामध्ये करण्यात आली आहे . सावित्रीबाई फुलेच्या कामाबद्दल ‘ इंडिक टेलाच्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे . छत्रपती – फुले – शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत . क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावं आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं , शिक्षण देत असतांना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे , शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले . समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले . या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तीकडून प्रहार केला जात आहे . एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेवर चिखलफेक करीत आहे . या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडनी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरु आहे . ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे . तरी, सावित्रीबाई फुलेच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या “इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट” वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणार वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी , संबंधित लेखकास योग्यती कार्यवाह करण्यात यावी . अन्यथा सर्व संघटना तीव्र आंदोलन करतील . पुढील होणाऱ्या परिणामास शासन जवाबदार राहील. या प्रसंगी पोलीस निरीक्षक धरणगाव श्री. ढमाले यांना निवेदन देतेवेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादी चे नेते व समता परिषद विभागीय संघटक ज्ञानेश्वर महाजन, धरणगाव समता परिषद व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष धनराज माळी सर , मोठा माळी वाडा समाज अध्यक्ष विठोबा मोठा माळी वाडा, लहान माळी वाडा समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, माजी नगराध्यक्ष पुष्पा ताई महाजन, राष्ट्रवादीचे नेते मोहन नाना पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रवी दादा पाटील सुखदेव महाजन, मोतीलाल महाजन, महेंद्र महाजन, व्ही. टी. माळी सर, राजेंद्र महाजन, रवींद्र महाजन, गोपल महाजन, गुलाब महाजन ऍड शरद माळी, भाजपा गटनेते कैलास माळी सर, हेमंत माळी सर, जगन्नाथ आहिरे, शाळीग्राम पाटील, दीपक महाजन, गणेश महाजन, गुलाब महाजन, गोपाल महाजन, गणेश महाजन, महेंद्र चव्हाण, ओंकार माळी, बापू मोरे, राजनंदिनी महाजन, अपेक्षा महाजन सहा समाज बांधव ओ बी सी पदाधिकारी व महात्मा फुले समता परिषद चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.