जळगांव-खताचे लिंकिंग बंद करा आणि रेशन कार्ड मिळावे ; धरणगाव तालुका राष्ट्रवादीची मागणी
धरणगाव – आज १७ जुलै रोजी माननीय आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर (मा.कृषी व परिवहन राज्यमंत्री कथा पालकमंत्री जळगाव) यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे धरणगाव येथे रेशनकार्ड मिळणे बाबत नायब तहसीलदार सातपुते साहेब यांना व युरीया खतांवर लिक्किंग सध्या मोठ्या प्रमाणात चालु आहे त्या संदर्भात धरणगाव तालुका कृषी अधिकारी देशमाने साहेब व मोरे साहेब पंचायत समिती कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी धनराज माळीसर तालुका अध्यक्ष, मोहन नाना जेष्ठ नेते, अरविंद देवरे आबा- कार्याध्यक्ष, रंगराव सावंत मार्केट कमिटी संचालक, बाळासाहेब पाटील जेष्ठ नेते, मनोज पाटील युवक अध्यक्ष, शरद आबा अजनंविहिरे दिनानाथ चव्हाण अजनंविहिरे, भुषण पाटिल कार्याध्यक्ष युवक, दिनेश भदाणे, सुनिल पाटील युवक उपाध्यक्ष, आफोज पटेल, युवक उपाध्यक्ष, आदि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.