जळगांव : धरणगाव येथील संजय नगर भागात ६० लक्ष निधीतून बांधण्यात आलेल्या महिला शौचालयाचे उद्घाटन संपन्न
धरणगाव – महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव व बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून धरणगाव येथील संजय नगर भागात ६० लक्ष निधीतून महिला शौचालय बांधण्यात आले. या शौचालयाचे आज रोजी माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील सर आणि त्या प्रभागातील नगरसेवक सुरेश महाजन (बुट्या महाजन) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संजय नगर परिसरात बांधण्यात आलेल्या शौचालयामुळे आता महिलांची गैरसोय होणार नाही म्हणून परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख विलास भाऊ महाजन, भाजपा शहर प्रमुख दिलीप भाऊ महाजन गटनेते पप्पू भावे, वाल्मीक पाटील, उपतालुकाप्रमुख संजय चौधरी, बुट्या पाटील, युवा सेनेचे पवन महाजन, सोनू महाजन, चंद्रकांत माळी, पापा वाघरे, भाजपाचे कन्हैया रायपूरकर, गटनेते कैलास माळी सर, नगरसेवक ललित येवले, विजय महाजन, सुनील चौधरी, युवा सेनेचे हेमराज चौधरी, मयूर मोरावकर, प्रशांत देशमुख, शिवसेनेचे उपशहर प्रमुख बाळासाहेब जाधव, प्रशांत देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.