जळगांव – धरणगाव येथील सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयाचा इ.दहावीचा निकाल 100%
धरणगाव – बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयाचा सन 2022-23 चा नुकताच लागलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालात शाळेचा *100%* निकाल लागला असून,यावर्षी शाळेतून एकूण *244* विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. शाळेतून *प्रथम–कु अनुष्का सुनिल बडगुजर (97.20%)* *द्वितीय– कु.लीना दीपक चौधरी (96%)* *तृतीय– कु.मोहिनी प्रवीण निकम (95.80%)* क्रमाने आलेत.यात *90% पेक्षा जास्त एकूण 58 विद्यार्थी* तसेच *80%पेक्षा जास्त 201 विद्यार्थी* उत्तीर्ण झालेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. हेमलालशेठ भाटिया,सचिव प्रा.रमेश महाजन, संचालक घनश्यामसिंह बयस, रघुनाथ चौधरी, रामनाथ पाटील,सौ शोभाताई चौधरी, सुशीलभाई गुजराथी,ऍड.राजेंद्र येवले,ललित उपासनी,शांताराम महाजन,प्रदीप मालपुरे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व गावातील नागरिक पालक यांनी अभिनंदन केले.