जळगांव-धानोरे तालुका धरणगाव येथे संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह उत्साहात संपन्न
जळगांव – धानोरे तालुका धरणगाव येथे मागील वर्षी श्री संत शिरोमणी सावता माळी यांचे मंदिर उभारण्यात आले मंदिरासाठी कैलासवासी चिंतामण व्यंकट बाविस्कर यांनी जमीन दिली. यावर्षी साधू संतांच्या आशीर्वादाने आणि गुरुवर्य महामंडलेश्वर श्री श्री 1008 भगवान बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह श्री संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी निमित्ताने दिनांक 09:07:2023 ते 16:07:2024 पर्यंत सात दिवसाचे सकाळी पाच ते सहा काकडा आरती तसेच रात्री आठ ते दहा कीर्तनाच्या कार्यक्रम संपन्न झाला.
तसेच हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे काल्याचे किर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदरहून काल्याची कीर्तनाची सेवा धानोरे येथील लक्ष्मण प्रकाश महाजन यांच्याकडून आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री नामदार गुलाबराव जी देवकर साहेब तसेच गुलाबराव जी वाघ, धरणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वरजी महाजन, कैलास माळी सर, निलेश भाऊ चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य जानकीराम भाऊ पाटील रवींद्र भिला पाटील धनराज माळी सर जिल्हा परिषद सदस्य माधुरी ताई तसेच जिजाबराव पाटील तसेच भारतीय स्टेट बँक चे धरणगाव शाखेचे मॅनेजर दुर्गुडे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली तसेच सर्व धानोरे ग्रामस्थांनी सहकार्य केले.