जळगांव – धुळे हायवेवर होते अवैधरित्या दारूची विक्री ! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाईची आवश्यकता !
जळगांव – संपूर्ण महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यातच संपूर्ण जळगांव जिल्ह्यात अवैध दारू विक्रीचे पेव वाढले आहे. जळगांव – धुळे हायवे वरील हॉटेल आणि ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असते. विशेष म्हणजे यातील काही ढाबे २४ तास सुरू असतात.
जिल्ह्यात याप्रकारे अवैध दारू विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यावर मात्र पट्टी लावलेली दिसते. मात्र सध्या विधानसभा निवडणूक असल्याने निदान आतातरी अश्या या हॉटेल आणि ढाब्यांवर कारवाईची आवश्यकता आहे.
काही हॉटेल आणि ढाब्यांवर बाहेरून दारू आणून बिनधास्तपणे परवाना नसतांना दारू पिली जाते जाते. त्यातच ड्राय डे च्या दिवशी देखील अश्या हॉटेल आणि ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात दारू प्रेमींची गर्दी उसळलेली असते. विशेष पथकाने जिल्हयाभरात धाडी टाकण्याची आवश्यकता आहे.