ताज्या बातम्या
जळगांव – पिंप्री खु – आदर्श माध्यमिक विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम.!
धरणगाव :- नुकत्याच जाहिर झालेल्या इयत्ता दहावी चा निकालात आदर्श माध्यमिक शाळा पिंप्री खुर्द तालुका धरणगांव येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून आपल्या मेहनतीने केलेल्या अथक परिश्रमचे फळ शंभर टक्के निकाल स्वरूपात मिळाले आहे. तसेच रोहित प्रमोद पाटील याने सोनवद केंद्रात प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळवले . विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष मधुकर रामजी चौधरी, सचिव विनोद चौधरी, तसेच आदर्श माध्यमिक व प्राथमिक विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
यांनी मिळवले यश..!
- प्रथम – रोहित प्रमोद पाटील – 92.80%
- द्वितीय – साक्षी रविंद्र पाटील – 89.40%
- तृतीय – हर्षल नंदलाल पाटील – 88.60 %